पस्तिशी प्लस महिलांचाही गणेशोत्सवात उत्साह

By Admin | Updated: September 27, 2015 01:33 IST2015-09-27T01:33:11+5:302015-09-27T01:33:11+5:30

महिला म्हणजे, घरातील कामे... जबाबदारी..मुलांचे शिक्षण हा त्यांचा जीवनाचा नित्यक्रम झालेला असतो; पण स्वत:साठी काही करायचे म्हटलं, तर या महिलांपुढे प्रश्न उभा राहतो

Pestici plus women enthusiastically celebrate Ganesh festival | पस्तिशी प्लस महिलांचाही गणेशोत्सवात उत्साह

पस्तिशी प्लस महिलांचाही गणेशोत्सवात उत्साह

बेनझीर जमादार, पुणे
महिला म्हणजे, घरातील कामे... जबाबदारी..मुलांचे शिक्षण हा त्यांचा जीवनाचा नित्यक्रम झालेला असतो; पण स्वत:साठी काही करायचे म्हटलं, तर या महिलांपुढे प्रश्न उभा राहतो, मला जमेल का? मी करू शकते का? वेळ मिळेल का, हा विचार करून त्या स्वत:च्या इच्छेकडे दुर्लक्ष करतात; पण आपल्याच मुलांमध्ये असणारी ही ढोल-ताशांची क्रेझ, ती इच्छा आपली राहून गेली, असे वाटणाऱ्या पस्तिशी प्लस महिलांची ती इच्छा, स्वप्नं, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अशाच काही महिलांनी पुढाकार घेऊन मानिनी ढोल-ताशा पथक, विघ्नहर्ता महिला वाद्य पथक अशा काही पथकांची सुरुवात करून, या महिलांचे स्वप्न सत्यात उतरविले.
महिलांना सुरुवातीला शिकविणार कोण, हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला होता; परंतु मुलांच्या मदतीने त्याच्या एका मित्राने शिकविण्याची तयारी दर्शविली. तो या महिलांना ढोल शिकविण्यास येत होता, त्या वेळी ते खूप अवघड वाटत होते; पण आंतरिक इच्छा असेल, तर तुम्ही किती ही मोठे ध्येय गाठू शकता.
हे वाक्य सार्थ करीत रिदम लक्षात घेऊन काही महिने हातावर प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली. मग हळूहळू ढोल हातात घेऊन वाजवायला सुरुवात केली. त्या वेळेस तो झालेला आनंद खरंच अविस्मरणीय होता.
पस्तिशी महिलांचा हा उत्साह पाहता, पथकांच्या अध्यक्ष म्हणतात की, हळूहळू वाजविण्याचे आमंत्रण मिळू लागले. लोकांपर्यत पोहोचणे हाच आमचा उद्देश होता.
यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पहिल्याच दिवशीची सुपारी मिळाली होती. यामुळे पथकातील सर्व महिला आनंदी व ढोल वाजविण्यासाठी खूप उत्सुक होत्या. त्यामुळे या सर्व महिलांसाठी हा अनुभव अविस्मरणीय आहे. तसेच, पुढे दहा दिवसांत आमच्या पथकास ठाणे, आलिबाग, तळेगाव अशा राज्यातील विविध भागातून व पुण्यातील काही उपनगरांतून वाजविण्याचे आमंत्रण मिळाले आहे. यामुळे पथकाचा उत्साह पाहता असेच म्हणता येईल की,
स्त्रीशक्ती अफाट आहे याला तोड नाही.
- स्मिता इंदापूरकर
(अध्यक्षा, मानिनी ढोल-ताशा पथक)
आमच्या पथकाचे हे पहिले वर्ष आहे. आमच्या पथकामध्ये ५ ते ५५ वर्षांपर्यंतच्या महिला सहभागी आहेत. यामध्ये कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील अशा क्षेत्रांतील महिला घर, आॅफिस सांभाळून यात सहभागी होतात. याचा मला फार आनंद होतो. या महिला फक्त स्वत:च्या आनंदासाठी, तर कोणी आपले ढोल- ताशा वाजविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पथकात सहभागी झाल्या आहेत.
- वृषाली मोहिते (अध्यक्षा,
विघ्नहर्ता महिला वाद्य पथक)

Web Title: Pestici plus women enthusiastically celebrate Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.