पेशवेकालीन उच्छवास देऊ शकतात ‘जीवन’

By Admin | Updated: June 30, 2014 23:40 IST2014-06-30T23:40:05+5:302014-06-30T23:40:05+5:30

पावसाने दडी मारल्याने पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर पाणी मिळणार नसल्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

Peshwedi can give up 'life' | पेशवेकालीन उच्छवास देऊ शकतात ‘जीवन’

पेशवेकालीन उच्छवास देऊ शकतात ‘जीवन’

>पुणो : पावसाने दडी मारल्याने पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर पाणी मिळणार नसल्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा वापर करण्याकरिता प्रत्येकाचीच शोधमोहीम सुरू झाली आहे. सुमारे 264 वर्षापूर्वी नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, याकरिता पेशव्यांनी उभारलेली कात्रज ते शनिवारवाडा पाणीपुरवठा यंत्रणा आजही पाणीटंचाईच्या परिस्थितीत पुणोकरांना ‘जीवन’ देऊ शकते. त्याबाबत ‘लोकमत’ने पुढाकार घेत जलस्रोतांची माहिती संकलित केली आहे. पेशव्यांनी तयार केलेल्या भुयारी दगडी नळ योजनेतील स्रोतांची स्वच्छता करून डागडुजी केल्यास पुणोकरांना मुबलक पाणी मिळणो सहज शक्य आहे. 
 
मंत बाळाजी पेशवे यांच्या पुढाकाराने 1749 मध्ये पुण्यामध्ये पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यात आली. कात्रज ते शनिवारवाडा अशी आश्चर्यकारक यंत्रणा आजही अनेक ठिकाणी सुस्थितीत सुरूआहे. तर अनेक पुणोकर या ठिकाणचे पाणी वापरत आहेत. जमिनीखाली सुमारे 3क् फुटांवर साकारण्यात आलेली ही यंत्रणा देशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली होती. चुना आणि विटांच्या साहाय्याने 6 फूट उंच, 2.5 फूट रुंद आणि 8 किमीची यंत्रणा उभारली आहे. 
पेशवेकालीन पाणीपुरवठा यंत्रणोचा शोध सुमारे 2क् वर्षापूर्वी लागला. त्याकरिता अभ्यासक श्रीकृष्ण भागवत आणि श्रीराम भागवत यांनी अथक परिश्रम घेतले. आजही ते या यंत्रणोसंदर्भात शोध घेत असून अडचणी आल्यास सोडविण्यास सहकार्य करीत आहेत. पेशव्यांनी उभारलेले हे बंदिस्त भुयार आजही सुस्थितीत आहे. काही वर्षापूर्वी उच्छवासांमध्ये गाळ साचल्याने नागरिकांना पाणी वापरता येत नव्हते. परंतु गाळ स्वच्छ केल्यानंतर पाणी वापरण्यायोग्य झाले आहे. 
महापालिकेने नागरिकांच्या सहकार्याने या यंत्रणोवर आणखी काम केल्यास पाणीटंचाईचे संकट दूर करणो सहज शक्य आहे. कात्रज येथील राजीव गांधी उद्यानापासून सुरू झालेले भुयार लेक टाऊन, स्टेट बँक कॉलनी, बिबवेवाडी, इंदिरानगर, केके मार्केट, सातारा रस्ता, विवेकानंद पुतळा, अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, राजर्षी शाहू सोसायटी, वाळवेकर नगर, शिवदर्शन, मित्र मंडळ कॉलनी, बालभवन, आचार्य अत्रे सभागृह, वाडिया हॉस्पिटल, काळा हौद, बदामी हौद, भाऊ महाराज बोळ, तुळशीबाग, कोतवाल चावडी, फरासखाना, नाना वाडा, शनिवारवाडामार्गे अमृतेश्वर आणि ओंकारेश्वर घाटार्पयत आहे. पाणीपुरवठा यंत्रणोतून येणारे पाणी अनेक ठिकाणी वापरले जात आहे. 
 
बांधकामामुळे उच्छवास 
बंद करण्याचा प्रयत्न
शहर आणि उपनगरांमध्ये विविध ठिकाणी नव्या इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बांधकामाच्या वेळी हे उच्छवास बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळी मोठय़ा प्रमाणात पाणी बाहेर आल्याच्या घटनाही घडल्या. परंतु तरीही अनेक ठिकाणचे उच्छवास तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. हे मार्ग खुले केल्यास आसपासच्या नागरिकांना पाण्याचा पुरवठा होऊ शकेल. 
 
ऐतिहासिक वारसा म्हणून जपायला हवा
सुमारे 264 वर्षापूर्वी नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे, याकरिता पेशव्यांनी उभारलेली कात्रज ते शनिवारवाडा पाणीपुरवठा यंत्रणा आजही सुरू आहे. केवळ महाराष्ट्राकरिता नाही, तर देशासाठी हा ऐतिहासिक वारसा आहे. परंतु हे आश्चर्य ऐतिहासिक वारसा म्हणून जपण्याकरिता प्रशासनाकडून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणोकरांनी हा योजनेचे महत्त्व समजून घेत उपयोग करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 
आजही मिळतेय पाणी
कात्रज तलाव, स्टेट बँक कॉलनी, इंदिरानगर, केके मार्केट, अण्णा भाऊ साठे रंगमंदिर, राजर्षी शाहू सोसायटी, शिवदर्शन, मित्र मंडळ कॉलनी, आचार्य अत्रे सभागृह, काळा हौद, भाऊ महाराज बोळ आदी भागांमध्ये आजही पेशवेकालीन पाणीपुरवठा यंत्रणोतून येणा:या पाण्याचा वापर केला जात आहे. 
 

Web Title: Peshwedi can give up 'life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.