शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 20:56 IST

जात पडताळणीचा अर्ज देखील ऑफलाईन चालणार 

ठळक मुद्देउमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस 

पुणे :  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उडालेला गोंधळ, नेटवर्कची समस्या आणि इंटरनेटचे स्पीड यामुळे अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन अखेरच्या क्षणी राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफ लाईन देखील अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी बुधवार (दि.30) अखेरची मुदत असून,  इच्छुक उमेदवारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

यंदा राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ ऑनलाईन पध्दतीने चे उमेदवारी अर्ज स्वीकारणे बंधनकारक केले. परंतू उमेदवारी अर्ज भरण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाची असलेली पंचायत इलेक्शन ही वेबसाईट अत्यंत स्लो काम करत असल्याने तसेच ग्रामीण भागात पुरेसे इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आता रात्रपाळी करावी लागली. तर दुसरीकडे जात पडताळणी करता कराव्या लागणाऱ्या अर्जासाठी ची वेबसाईट देखील अडखळत असल्याने आणि उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येत नसल्याने उडालेला गोंधळ लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी या दोन्ही प्रक्रिया ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन देखील करण्यास परवानगी दिली.राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळावर पुरेसे स्पीड मिळत नसल्याने एक अर्ज भरण्यासाठी तीन-चार तासांचा वेळ लागत होता.  उमेदवारांना रात्रभर नेट कॅफे,  महा ई सेवा केंद्रांमध्ये थांबावे लागत असून , काही उमेदवार दोन दोन दिवस प्रयत्न करूनही त्यांचे अर्ज भरले जात नव्हते. राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते किंवा जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक आहे , अन्यथा हे उमेदवार निवडणुकीत अपात्र ठरतात जात पडताळणीसाठी ऑनलाईन पद्धतीने बार्टी कडे अर्ज करावा लागतो त्यासाठीची वेबसाईट देखील अत्यंत धिम्या गतीने काम करत असल्याने उमेदवारांची अडचण झाली . त्यामुळे सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रक्रिया ऑनलाइन अर्ज भरताना प्रचंड गोंधळ उडाला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी आयोगाने ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली. ------जिल्हा परिषद उपाध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सर्व्हर ऑफलाईन जात असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास वेळ होत आहे,तसेच ऑनलाईन प्रक्रिया किचकट असल्याने अनेक इच्छुक अर्ज भरता आला नाही अशी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  रणजीत शिवतरे यांनी  जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख यांना केली आहे. तरी निवडणूक अर्ज ऑफलाईन स्वरूपात घेण्यात यावेत,अन्यथा अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असे देखील शिवतरे यांनी म्हटले.

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकzpजिल्हा परिषद