वारीसाठी एका पालखी सोबत ४० वारकऱ्यांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST2021-06-23T04:09:08+5:302021-06-23T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वारकरी आणि विश्वस्त यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी केलेल्या सर्व मागण्या अमान्य करत विभागीय आयुक्त ...

Permission for 40 Warakaris with a palanquin for Wari | वारीसाठी एका पालखी सोबत ४० वारकऱ्यांना परवानगी

वारीसाठी एका पालखी सोबत ४० वारकऱ्यांना परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वारकरी आणि विश्वस्त यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी केलेल्या सर्व मागण्या अमान्य करत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी (दि. २२) स्वतंत्र लेखी आदेश काढत शासनाने निश्चित केलेल्या नियमानुसारच पालखी सोहळा आणि वारीला परवानगी दिली आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंधरा दिवसांपूर्वी विश्वस्त आणि वारकरी प्रतिनिधी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक लोकांना परवानगी द्यावी व पालखी प्रस्थान सोहळ्यात अश्वांना परवानगी देण्यावर सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु शासनाने मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला असल्याने विभागीय आयुक्त यांनी शासनाच्या आदेशाच्या अधिन राहूनच लेखी आदेश काढले आहेत.

कोविड-१९ संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने कोविड-१९ ची तिसरी लाट येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यातच २० जुलैला पंढपूर येथे आषाढी यात्रा भरणार आहे. यामुळेच आयुक्तांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत.

चौकट

-राज्यातील मानाच्या १० पालख्यांच्या सोहळ्यास परवानगी.

-मानाच्या दहा पालख्याव्यतिरीक्त अन्य पालख्यांना आषाढी वारीस मान्यता नाही.

- देहू व आळंदीतील प्रस्थान सोहळ्यास प्रत्येकी शंभर व अन्य आठ पालख्यांच्या सोहळ्यास प्रत्येकी ५० वारकऱ्यांना मान्यता

- प्रस्थान सोहळ्यापूर्वी दोन दिवस अगोदर सहभागी शंभर टक्के लोकांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

-आषाढी वारी २०२१ च्या प्रस्थान सोहळ्यानंतर पादुकांसोबत पंढरपूरकडे वारीसाठी विशेष वाहनाव्दारे प्रति बस २० भाविक याप्रमाणे दोन बसमध्ये एकूण ४० वारकऱ्यांना परवानगी

- पालखी सोहळ्यातील संतांच्या पादुका विशेष वाहनाव्दारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पुढे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारीस शासन मान्यता.

Web Title: Permission for 40 Warakaris with a palanquin for Wari