शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

समाविष्ट गावांमधून होणार करवसुली, मिळकतकर सूत्रास स्थायीची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 3:44 AM

समाविष्ट ११ गावांमधून मिळकतकर वसूल करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर या गावांसाठी प्रत्येकी ३ कोटी याप्रमाणे एकूण ३३ कोटी निधीचे वर्गीकरणही स्थायी समितीच्या पुढील बैठकीत करण्यात येणार आहे.

पुणे - समाविष्ट ११ गावांमधून मिळकतकर वसूल करण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली. त्याचबरोबर या गावांसाठी प्रत्येकी ३ कोटी याप्रमाणे एकूण ३३ कोटी निधीचे वर्गीकरणही स्थायी समितीच्या पुढील बैठकीत करण्यात येणार आहे.न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमधील विकासकामांसाठी निधी देण्याबाबत राज्य सरकारने हात वर केले आहेत. प्रशासनाने नगरसेवकांच्या प्रभाग विकास निधीमधून काही निधी वर्ग करून घ्यावा, असा प्रस्ताव ठेवला होता, पण नगरसेवकांच्या विरोधामुळे तो स्थायी समितीने फेटाळून लावला. त्यामुळे या गावांमधून संतप्त भावना व्यक्त होत होत्या. गावांच्या महापालिकेतील समावेशासाठी प्रयत्न करणाºया हवेली तालुका कृती समितीने याचा निषेध करून आमचा पैसा आमच्यासाठीच वापरावा, अशी मागणी केली होती.त्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या गावांमधून मिळकतकर वसूल करण्यास मान्यता देण्यात आली. पण त्याचबरोबर गावांसाठी ३३ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यासही मंजुरी देण्यात आली. हा निर्णय समितीच्या पुढील बैठकीत होईल, असे समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. तिथे कोणती कामे करायची हे प्रशासनाने निश्चित केले आहे, त्यासाठी हा निधी पुरेसा आहे. अन्य निधी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात दिला जाईल, असे ते म्हणाले.मिळकतराची वसुली यापूर्वी समाविष्ट झालेल्या गावांच्या सूत्राप्रमाणेच केली जाणार आहे. ग्रामपंचायतीचा कर १ हजार रुपये असेल व महापालिकेचा कर त्याच मालमत्तेला १ हजार ५०० रूपये होणार असेल तर वरील जास्तीच्या ५०० रुपयांमधील २० टक्के पहिल्या वर्षी, त्यानंतरच्या दुसºया वर्षी ४० टक्के याप्रमाणे पुढील ५ वर्षांत संपूर्ण कर वसूल केला जाणार आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.या ११ गावांमध्ये मिळून एकूण १ लाख ४२ हजार ६३६ मालमत्ता आहेत. प्रशासनाने सर्वेक्षण करून व संबंधित ग्रामपंचायतींचे दप्तर तपासून ही संख्या निश्चित केली आहे. या सर्व मालमत्तांकडून कर वसूल केला जाणार आहे. मालमत्ता कराची या गावांसहची शहरातील बिलेही केंद्रीय टपाल खात्याच्या माध्यमातूनच मालमत्ताधारकांना पाठवण्याच्या प्रस्तावासही स्थायी समितीने मंजुरी दिली.स्मार्ट सिटीचा १ कोटीचा आगाऊ बोजा\\पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला पुढील वर्षाच्या हिश्श्यातील ५० कोटी रुपयांपैकी १ कोटी रूपये आगाऊ देण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली. कंपनीला केंद्र सरकार दरवर्षी १०० कोटी, राज्यसरकार ५० कोटी व महापालिका ५० कोटी रूपये देणार आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत १९४ कोटी, राज्य सरकारने ९३ कोटी व महापालिकेने १०० कोटी रूपये दिले आहेत. विकासकामांसाठी कंपनीला जागतिक बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे. केंद्र सरकारच्या हिश्श्याइतकाच हिस्सा राज्य सरकार व महापालिकेचा असेल तरच कंपनी त्या कर्जासाठी पात्र ठरणार आहे. त्यासाठी फक्त १ कोटी रूपये कमी पडत असल्याने कंपनीने स्थायी समितीकडे पुढील वर्षाचे १ कोटीरूपये आगाऊ देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकर