शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात वाढतोय संशोधनाचा टक्का

By admin | Updated: February 28, 2015 02:22 IST

विद्यार्थ्यांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या

पुणे : विद्यार्थ्यांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे संशोधनाचा टक्का वाढत आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये ४०५ जणांनी विविध विषयांत संशोधन करीत पीएचडी पदवी मिळविली. मागील वर्षी ही संख्या ३३० एवढी होती. विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या सोमवारी होत आहे. त्यानिमित्त शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमागील आवारात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवी प्रदान होणार आहे. यामध्ये एकूण ८८ हजार ३०६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान केली जाणार आहे. त्यापैकी ४०५ पीएचडी पदवीधारक आहेत. एकूण १०० सुवर्णपदके ६१ विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.मागील काही वर्षांपासून विद्यापीठातील संशोधनामध्ये वाढ होत आहे. याविषयी बोलताना डॉ. गाडे म्हणाले, विधी, अभियांत्रिकी, वाणिज्य, औषधनिर्माणशास्त्र या विद्याशाखांमध्ये मार्गदर्शक खूप कमी होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळत नव्हती. आता मार्गदर्शकांची संख्या वाढविली आहे. तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. हा ट्रेंड आशादायी आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.