शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पुणे जिल्ह्यातील 'कुपोषण' मुक्तीच्या योजनेकडे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 13:31 IST

पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे ३ ते ४ लाख बालकांच्या सर्व्हेक्षणामधून १४२ अतितीव्र कुपोषित बालके (सॅम) तर १ हजार १२ मध्यम कुपोषित बालके आढळून आली होती.

रविकिरण सासवडे-बारामती : कोरोना काळात जिल्ह्यातील कुपोषित बालकांना चौरस आहार मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये दत्तक पालक योजना सुरू केली. मात्र या योजनेला लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यातील अधिकारी व कर्मचाºयांनी दत्तक पालक योजनेमध्ये सहभाग घेत कुपोषित बालकांना दत्तक घेतले आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेमुळे घरीच कुपोषित बालकांना सकस आहार देण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे ३ ते ४ लाख बालकांच्या सर्व्हेक्षणामधून १४२ अतितीव्र कुपोषित बालके (सॅम) तर १ हजार १२ मध्यम कुपोषित बालके आढळून आली होती. त्यापैकी दत्तक पालक योजनेमध्ये जिल्ह्यातील १२४ अति तीव्र कुपोषित बालाकांना, तर ८३८ मध्यम कुपोषित बालकांना घरामध्येत प्रोटीन युक्त आहार देण्यात येत आहे. त्यासाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हवेली, मुळशी, शिरूर आणि वेल्हा या तालुक्यांमधील ग्राम बाल विकास क्रेंद्रांचा (व्हीसीडीसी) ५० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर इतर तालुक्यांमध्ये व्हीसीडीसी सुरू आहे.  ऑगस्टपासून आतापर्यंत जिल्ह्यातील ४०१ बालके साधारण वजनापर्यंत आली आहेत. तर अजुनही ८६ अतितीव्र कुपोषित व ६२१ मध्यम कुपोषित अशी एकूण ७०७ बालके कुपोषित आहेत.

कुपोषण मुक्तीमध्ये अंगणवाडी केंद्राचा सहभाग परिणामकारक असतो. मात्र कोरोना साथीमुळे मार्च महिन्यापासून अंगणवाडी केंद्र बंद आहेत. बालकांच्या रोजच्या आहार आणि वजन नोंदीवर अंगणवाडी सेविका, मदतनिस लक्ष ठेवून असतात. सध्याच्या काळात आपले बालक कुपोषणापासून मुक्त व्हावे यासाठी पालकांनी स्वत:हून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे निरिक्षण मागील दिवसांमध्ये नोंदवण्यात येत आहे.  जिल्ह्याचा कुपोषण मुक्तीचा दर ६० ते ६५ टक्क्यावरून वाढून तो ८० ते ८५ टक्क्यांवर पोहचवण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र दत्तक पालक योजनेमध्ये कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांच्या सकस आहाराची जबाबदारी घेणे अपेक्षित होते. मात्र काही अपवाद वगळता जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या आवाहनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील कुपोषित बालकांची स्थिती

तालुका         साधारण श्रेणी        श्रेणी वर्धन न झालेलीआंबेगाव              १०                       ८७बारामती              ३३                       ४३भोर                    १२                       ३२दौंड                    १०                        ५७हवेली                 ९३                        ४०इंदापूर                ०१                      १३०जुन्नर               ६३                         ७८खेड                   २२                       १२९मावळ               ०८                         ३२मुळशी              २५                          ०९पुरंदर               ३६                          ३०शिरूर               ६५                          २२वेल्हा                २०                         १८

........ व्हीसीडीसीचा मुळ उद्देशच पालकांचे प्रबोधन करणे हा आहे.  पालकांनी सुचनांचे पालन करून बालकांच्या आहारकडे लक्ष दिल्यास जिल्ह्याचा कुपोषणमुक्तीचा दर आपण ८० ते ८५ टक्क्यांवर पोहचवू शकू.- दत्तात्रय मुंडे, मुख्य बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे------------------------ 

टॅग्स :Baramatiबारामतीzpजिल्हा परिषदcollectorजिल्हाधिकारी