शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
2
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
3
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
4
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
5
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
6
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
7
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
8
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
9
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
10
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
11
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
12
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
13
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
14
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
15
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
16
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
17
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
18
अत्यंत प्रतिकूल काळात सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण करणारे आद्य शंकराचार्य यांची जयंती; वाचा कार्य!
19
Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!
20
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:42 PM

जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणीवाटपाबाबत अन्यायकारक धोरण राबविले आहे.

ठळक मुद्देजलसंपदा खात्याच्या नव्या धोरणाचा फटका इंदापूर तालुका कायम दुष्काळी राहणार असल्याचा आरोप

इंदापूर ( निमसाखर) : जलसंपदा खात्याने नीरा डावा कालव्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणीवाटपाबाबत अन्यायकारक धोरण राबविले आहे. धोरणामुळे आगामी काळात इंदापूर तालुक्याचे वाळवंट होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील तीनही साखर कारखान्यांवर संकट ओढवणार आहे. धोरणबदलाबाबत त्वरित दखल घ्यावयाची गरज असून मोठे जनआंदोलन व न्यायालयीन लढा उभा करावा लागणार आहे, अशी माहिती माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिली.   निमसाखर (ता.इंदापूर)येथे एका खासगी भेटीदरम्यान पाटील आले असता त्यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. गेली वीस वर्षांपासून तालुक्यातील पाणी वाटपाची वहिवाट गेल्या पाच वर्षात मोडून काढल्यामुळे ही आज परिस्थिती उद्भवली आहे. इंदापूर तालुक्याला मिळणाऱ्या साडेबावीस टीएमसीपैकी दहा टीएमसी पाणी यापुढे तालुक्याला मिळणार नाही. परिणामी इंदापूर तालुका कायम दुष्काळी राहणार असल्याचा आरोप पाटील यांनी केला. पाटील पुढे म्हणाले की, ‘ इंदापूर तालुका शेतीच्या पाणीवाटपाबाबत कायमच टेलएण्डचा (शेवटचा) तालुका म्हणून ओळखला जातो. भाटघर धरणाच्या निर्मिती वेळेस नीरा डावा कालवा फाटा क्रमांक ४६ ते फाटा क्रमांक ५९ या उपकालव्याद्वारे तालुक्यातील सिंचनाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले होते.  आघाडी सरकारच्या काळात सिंचनाच्या क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झाल्याचे लक्षात आल्याने खडकवासला, नीरा-देवघर अशा दोन्ही धरणातून सणसर कटद्वारे इंदापूर तालुक्यातील सुमारे ७५ ते ७८ टक्के क्षेत्र ओलिताखाली आणले होते. बारामती तालुक्यातील फक्त साधारण ३५ टक्के ओलिताखाली आले होते. शेटफळ तलावात त्यावेळी दोन टीएमसी पाण्याचा साठा करण्यात येत होता. सर्वसाधारण सिंचनासाठी २२ टीएमसी पाणी मिळत होते. मात्र जलसंपदा खात्याने नुकताच एक निर्णय घेतला असून त्यामध्ये इंदापूर तालुक्याचे सहा टीएमसी पाणी उडवण्यात आले आहे. नवीन आराखड्यानुसार खरिपासाठी पाच टीएमसी, रब्बीसाठी चार आणि उन्हाळी हंगामासाठी अडीच टीएमसी असे आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र इंदापूर तालुक्याला प्रत्यक्षात किती पाणी मिळणार हा प्रश्नच आहे.  २२ गावातील शेतकºयांना ७ नंबर अर्जावर (तात्पुरती पाणी परवानगी) गेल्या वीस वर्षापासून देण्यात येत असलेल्या पाणी आवर्तनाचा प्रश्नच येणार नाही.  ........शेती उत्पादनावर सर्वाधिक परिणामजलसंपदा खात्याच्या नवीन निर्णयामुळे नीरा-देवघर धरणातून मिळणारे पाच टीएमसी पाणी त्याप्रमाणे सणसर कट मधून मिळणारे बहुतांश पाणी आता मिळणार नाही. तसेच शेटफळ तलावासाठी मिळणारे दोन टिएमसी पाणीही मिळणार नाही. उन्हाळी हंगामात किमान दोन आवर्तनाची गरज असते त्याद्वारे चाऱ्याचे उत्पादन, उन्हाळी हंगामातील पिके यांना पाणी मिळते. पण उन्हाळी हंगामात फक्त एक वेळेला आणि तेही पाणी असेल तर आवर्तन देण्यात येणार आहे . शेती उत्पादनावर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. ....

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीcongressकाँग्रेस