शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ मध्ये जनतेची युतीला साथ; उद्धव ठाकरेंच्या स्वार्थामुळे वेगळीच राजकीय परिस्थिती - प्रमोद सावंत

By राजू हिंगे | Updated: November 14, 2024 15:28 IST

महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर एक वर्षात महाराष्ट्र - गोवा महामार्ग तयार होईल

पुणे : सन २०१४ मध्ये राज्यातील जनतेने भाजपला बहुमत दिले. २०१९ मध्ये देखील जनतेने युतीला साथ दिली . पण उध्दव ठाकरे यांच्या स्वार्थामुळे वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे. 

सावंत म्हणाले, महाराष्ट्र मध्ये पुन्हा महायुती सरकार सत्तेत आले पाहिजे. गोवा मध्ये रस्ते,रेल्वे आणि विमानतळ याचा मागील दहा वर्षात कायापालट झाला आहे. महाराष्ट्र हा विकसित महाराष्ट्र करण्यासाठी महायुती सरकार राज्यात पुन्हा आले पाहिजे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे सोबत भाजप राज्यात चांगल्या प्रकारे काम करत आहे. मराठी भाषा मध्ये माझे शिक्षण झाले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काँग्रेसकडून कधी दिला गेला नाही पण भाजपच्या केंद्र सरकारने आता त्याला दर्जा दिला आहे ही महाराष्ट्रसाठी गौरवाची बाब आहे. युवा शक्ती, महिला शक्ति, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार मुद्द्यावर सरकारच्या सर्व योजना राबवल्या जात आहे.

महाराष्ट्र ते गोवा मार्ग एक वर्षात पूर्ण होईल 

महाराष्ट्र ते गोवा दरम्यानचा महामार्ग रस्ता मध्ये काही कंत्राटदार चांगले मिळाले नाही तसेच महाराष्ट्र मध्ये मध्यंतरी सरकार बदलले गेल्याने हा रस्ता निर्माण करण्यात अडचणी निर्माण झाल्या. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आता याबाबत पुढाकार घेतला असून राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यावर एक वर्षात हा मार्ग पूर्ण होईल  काँग्रेस गरीबी कधीच दूर करू शकले नाहीत

गृह आधार योजना अंतर्गत आम्ही १२ वर्ष महिलांना दर महिना १५०० रुपये मदत दिली आहे. पण कर्नाटकने अशी घोषणा निवडणूकवेळी केली पण काँग्रेसने त्याची अंमलबजावणी केली नाही. शेतकरी आत्महत्या होत असताना त्यांना आधार देण्यासाठी शेतकरी सन्मान योजना, कृषी पंप वीज माफी , पीक विमा दिली गेला आहे. काँग्रेसने देशात गरीबी हटाव योजना आणली पण गरीबी ते कधीच दूर करू शकले नाही अशी टीका त्यांनी यावेळी काँग्रेसवर केली. 

राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करतात

काँग्रेसने महाराष्ट्र मध्ये ६० वर्ष राज्य केले त्यांनी त्यांच्या किती पायाभूत सुविधा निर्माण झाल्या सांगाव्यात. पण मागील दहा वर्षात मोदी सरकारने महाराष्ट्र मध्ये अनेक विकासकामे राबवली आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारतसाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी. काँगेस नेते राहुल गांधी कोणतेही बिनबुडाचे आरोप सातत्याने करत असतात असा आरोप प्रमोद सांवत यांनी सांगितले. आदिवासी यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने प्रथम केले. काँग्रेसला ६० वर्षात बिरसा मुंडा कधी आठवले नाही पण भाजपने त्यांची राष्ट्रीय स्तरावर जयंती सुरू केली. समान नागरी कायदा हा सन १९६४ पासून गोवा राज्यात राबवला जात आहे आणि सर्व समाज योग्यप्रकारे राहत आहे. मालमत्ता ही लग्ना नंतर पुरुष आणि महिला यांच्यात समान वाटप होते असेही सांवत यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४goaगोवाChief Ministerमुख्यमंत्रीMahayutiमहायुती