शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Ajit Pawar: लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 13:42 IST

महिलांचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मुंबईच्या महापौर या प्रथम नागरिक महिला आहेत

पुणे : वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी 4 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. याविषयी महापौर किशोरी पेडणेकरांवर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. ''लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे'', असे ते म्हणाले आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठकीत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

पवार म्हणाले, ''महिलांचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मुंबईच्या महापौर या प्रथम नागरिक महिला हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले म्हणूनच त्यांनी तक्रार केली आहे. एसटी संपाच्या बाबतीत लोक काही वक्तव्य करत होते. लोकांनी आता बोलताना तारतम्य बाळगणे सोडले आहे. अशा  वक्तव्यांमुळे समाजातही तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. कोणीही असो लोकांसमोर व्यवस्थितच बोलता आले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते अथवा अजून कोणीही असो असे वक्तव्य करू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.'' 

महिला आयोगाने देखील अहवाल मागविला 

मुंबईची महापौर ही एक महिला आहे. प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. असे असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा व समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. यामुळे शेलारांविरोधात पोलिसांत तक्रार करत असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी महिला आयोगाने देखील अहवाल मागविला आहे.  काय केले होते वक्तव्य 

बालकाच्या व वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईचेही सोमवारी निधन झाले. सिलिंडर स्फोटाची घटना ही 30 नोव्हेंबरला झाली होती. शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेत 'सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात' असे वक्तव्य केले होते. यावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीAshish Shelarआशीष शेलार