शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो, सावधान! मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांची पुन्हा कडक कारवाई सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 18:12 IST

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत होऊ शकतो मोठा निर्णय..

पुणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून पुणे शहरामध्ये मास्क न वापणाऱ्यांवर कारवाई करायला महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच आणि हॉटेलमध्ये जाऊन मास्क न घालणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावला जातो आहे. आता कारवाईला सुरुवात झाली असली तरी या पुढे काही निर्बंध घालायचे का याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर उद्या होत असलेल्या बैठकीमध्ये घेण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये करुणा रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळाली आहे. चार टक्क्यांपर्यंत आलेला टेस्ट पॉझिटिव्हिटी रेशो आता दहा टक्क्यांपर्यंत आलेला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे यादृष्टीने आता काही निर्बंध नव्याने लागू केले जातात का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आज सकाळपासूनच संपूर्ण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये मास्क परिधान न करणार्‍यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली. पोलीस प्रशासन महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ास्क परिधान न करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र यानंतरही अनेक जण परिधान करत नसल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.लोकमत शी बोलताना कारवाई करणाऱ्या पथकातील एक अधिकारी म्हणाले ," वाढती संख्या लक्षात घेता आम्ही मास्क विरोधातील कारवाई संपूर्ण भागात करत आहोत. मात्र यानंतरही अनेक जण मास्क घालणे गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कारवाई दरम्यान आम्हाला अनेक लोक असेही भेटतात जी सांगतात कालचं मी दंड भरला पण तरीही त्यांनी घातलेला नसतो. त्यांना पुन्हा दंड केला तरी त्याचा किती उपयोग होईल असा प्रश्न आम्हाला यामुळे पडतो."

दरम्यान आणखी काही निर्बंध आणले जाऊ शकतात का याबाबत विचारले असता जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख म्हणाले ,"आज पासून मास्क विरोधातील कारवाई ला सुरुवात झालेली आहे. याशिवाय काही निर्बंध लावायचे का याबाबत सर्वांच्या सूचना येतील त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर रविवारी ची बैठक होणार आहे त्यामध्ये निर्णय घेतला जाईल" 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका