शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अबबं ! पुण्यात नियम मोडणाऱ्या चालकाला २४ हजारांचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:32 IST

पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या खोचक पण स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांचे पुणेरी टोमणे आणि पाट्याही प्रसिद्ध आहेत. आता तर त्याच्याही पुढे जात पुणेकरांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

पुणे : पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुणेकरांच्या खोचक पण स्पष्टवक्त्या स्वभावामुळे त्यांचे पुणेरी टोमणे आणि पाट्याही प्रसिद्ध आहेत. आता तर त्याच्याही पुढे जात पुणेकरांनी एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

नियम तोडून गाडी चालवणाऱ्या पुणेरी वाहन चालकाला थोडे थोडक्या नव्हे तर तब्बल २४ हजार २०० रुपयांचा दंड झाल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या दंडाची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे.नुकतीच पुणे  वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्‍कम न भरणाऱ्या चालकांसाठी ‘पी.टी.पी.’ नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार शहर वाहतूक शाखेकडून पुणे ट्रॅफिक पोलिस नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत चौकांमध्ये नाकाबंदी करून ई-चलन मशिनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्‍कम तपासली जात आहे.

एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्‍कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे.लष्कर वाहतूक विभागातील पोलिस हवालदार मार्तंड जगताप यांनी गुरुवारी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीच्या चालकाने यापूर्वी पुणे-मुंबई एक्‍सप्रेस-वेवर तब्बल २४ वेळा स्पीड लिमिटचे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यापोटी प्रत्येक वेळी एक-एक हजार रुपये असा २४ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. परंतु ती रक्‍कम भरली नव्हती. त्यामुळे आता त्यांना २४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. याबाबत वाहतूक शाखेचे प्रमुख पंकज देशमुख म्हणाले की, फेब्रुवारीपासून शहरात ए चलन सुरु झाले आहे. त्यामुळे एकाच वेळी संबंधित वाहनावरील सर्व दंड समोर येतो आणि वसुली करणे सुकर होते. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस