पदपथावर वाहन लावल्यास दंड
By Admin | Updated: June 10, 2017 02:23 IST2017-06-10T02:23:06+5:302017-06-10T02:23:06+5:30
महापालिका प्रशासनाने पदपथ धोरणात नमूद केलेली पार्किंग पॉलिसी आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. त्यात प्रामुख्याने

पदपथावर वाहन लावल्यास दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका प्रशासनाने पदपथ धोरणात नमूद केलेली पार्किंग पॉलिसी आता लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. त्यात प्रामुख्याने पदपथावर वाहने लावणाऱ्यांना भरभक्कम म्हणजे काही हजार रुपयांचा दंड करण्याची तरतूद आहे. तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. तो मान्य झाला तर कुठेही वाहन लावण्याची चूक नागरिकांना काही हजारात पडणार आहे.
बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांना वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दंड करण्यात येत असतो. मात्र त्याची मर्यादा एकदम कमी आहे. त्यामुळे दंड जमा करणाऱ्यांना त्याचे काहीही वाटत नाही. यावर उपाय म्हणून वाहतूक शाखेने दंडात वाढ करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. दंडाच्या रकमेपैकी अर्धी रक्कम महापालिकेला व अर्धी रक्कम वाहतूक शाखेला देण्यात येत असते. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी पदपथ धोरण तयार करून त्यात पदपथावर अनधिकृतपणे लावल्या जाणाऱ्या वाहनांसाठीचा दंड वाढवण्याच्या सूचनेचा समावेश केला होता.