शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यात वाहतुक नियमांचा भंग करणार्‍या 90 जणांवर दंडात्मक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 18:20 IST

शनिवार व रविवार लोणावळ्यात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते.

ठळक मुद्देई चलनद्वारे 80 हजारांचा दंडवाहतुक नियोजनासाठीपोलीस, वॉर्डन, पोलीस मित्र दिवसभर तैनात

 लोणावळा : शहर आणि परिसरात पर्यटनाला आल्यानंतर वाहतुक नियमांचा भंग करत वाहन चालविणे, लेनची शिस्त मोडणे असे प्रकार करणार्‍या 90 वाहनांवर आज कारवाई करत लोणावळा शहर पोलीसांनी ई चलनद्वारे 80 हजारांचा दंड केला.     कुमार चौक, र‍ायवुड चौक व भुशी धरण मार्गावर ही कारवाई करण्यात आली. शनिवार व रविवार लोणावळ्यात पर्यटनाकरिता येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते. धरणाकडे जाताना वाहनचालक सर्रासपणे वाहतुक नियमांचा भंग करत वाहने चालवितात, लेनची शिस्त मोडत वाहतुक कोंडी करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक करणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे असे प्रकार करणार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये काही वाहनचालकांचा देखील समावेश आहे.    शहरात आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असून पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्यासह सुमारे शंभर पोलीस जवान, महिला पोलीस, वॉर्डन, पोलीस मित्र दिवसभर वाहतुक नियोजनासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील वाहतुक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने ही कारवाई करण्यात आली.

 * सहारा पुल नो पार्किंग झोन 

भुशी धरणाकडे जाणार्‍या मार्गावरील सहारा पुलावर वाहने उभी करणे, फोटो काढणे, घोळक्याने उभे राहणे यास मनाई करण्यात आली आहे. सहारा पुलाच्या दोन्ही बाजुला रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. ही कोंडी व पर्यटकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांनी सांगितले.

 * हुल्लडबाजांची गय करणार नाही 

पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करत सार्वजनिक शांतता भंग करणार्‍यांची गय केली जाणार नाही. महिला व मुलींची छेडछाड करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणे, शांततेचा भंग करणे, धरणाच्या पाण्यात उतरणे अशा प्रकारे हुल्लडबाजी करणार्‍यांवर सक्त कारवाई करणार असल्याचे लोणावळा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी