शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

Pune Pedestrian Day: लक्ष्मी रस्त्यावर ११ डिसेंबरला ‘पादचारी दिन’, मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल

By अजित घस्ते | Updated: December 6, 2024 17:35 IST

लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद असणार आहे

पुणे: पादचाऱ्यांच्या हक्कासाठी महापालिकेतर्फे गेल्या 4 वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जातो. यंदाही लक्ष्मी रस्त्यावर नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक या दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या मार्गावर "र्व्हेईकल फ्रि रोड" करण्यात येणार आहे.यावेळी लक्ष्मी रोडवरील वाहतूकीत तात्पुरते बदल करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेनेे गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद असणार आहे. हा रस्ता आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. वाहनविरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजवण्याचे काम पथ विभागातर्फे हाेणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हा रस्ता वाहनांना वापरता येणार नाही. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलीचे आयोजन करण्यात येत आहे. पीएमपीएलकडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे. युनायटेड वे मुंबईतर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेबाबत कार्यशाळा आयोजित केली आहे. एकांश ट्रस्टतर्फे अंध, अपंग नागरिक यांच्याबाबत संवेदनशीलता आणि सार्वत्रिक प्रवेश योग्यताविषयक कार्यशाळा आयोजित केली आहे. सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटतर्फे पादचारी दिनानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत काढलेले चित्रकला प्रदर्शन आयाेजित केले आहे.

परिसर संस्थेमार्फत सार्वजनिक वाहतूक आणि जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शनही आयोजित केले आहे. आयईडीटीपी संस्थेमार्फत संख्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन भरवले जाणार आहे. रंग कला अकादमीतर्फे पादचारी दिनानिमित्त भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थेमार्फत प्रदर्शन आयाेजित केले आहे, 

असे आहेत पर्यायी मार्ग

-लक्ष्मी रोडने बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.- कुमठेकर रोडवरून लक्ष्मी रोडवरती जाणारी सर्व वाहने सरळ चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.- लोंखडे तालिम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी सर्व वाहने लक्ष्मी रोडने न जाता सरळ केळकर रोडने टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकTrafficवाहतूक कोंडीbikeबाईकcarकार