लासुर्णे : देशात हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकमेकाबद्दल असलेले प्रेम-स्नेह यामुळे आजही देशात शांतता कायम आहे. देश एकसंघ ठेवण्यात हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांचे कार्य मोलाचे आहे, असे मत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार वसंत मोहोळकर, संजय मोहोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नीरा-भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, दूध गंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील, शहाजी शिंदे, कर्मयोगीचे माजी उपाध्यक्ष माऊली बनकर,माजी सभापती प्रदीप पाटील, विलास माने, विजय मचाले, निवृत्ती गायकवाड, कर्मयोगीचे संचालक राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, मच्छिंद्र अभंग,आबासाहेब शिंगाडे, दिनकर नलवडे, अर्बन बँकेचे संचालक सत्यशील पाटील, उल्हास जाचक, बाळासाहेब होळ, डाळींब संघाचे अध्यक्ष अतुल शिंगाडे, मच्छिंद्र चांदणे, किशोर पवारसह जंक्शन, वालचंदनगर कळंब, आनंदनगर, शेळगाव, लासुर्णे, कळस, बोरी, अंथुर्णे, सणसर, भरणेवाडीसह अन्य भागांतील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहित मोहोळकर, तर बबन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ऋषीकेश मोहोळकर यांनी आभार मानले.
हिंदू-मुस्लिम ऐक्यामुळेच देशात शांतता : हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 15:23 IST
देश एकसंघ ठेवण्यात हिंदूंबरोबरच मुस्लिम बांधवांचे कार्य मोलाचे आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्यामुळेच देशात शांतता : हर्षवर्धन पाटील
ठळक मुद्देजंक्शनमध्ये इफ्तार पार्टीला उत्साही प्रतिसाद