शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लवकरात लवकर थकीत ५२ कोटी भरा, अन्यथा पुरवठा बंद करू! सीएनजीची 'पीएमपी'ला नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:44 IST

अत्यावश्यक सेवेतील गाड्या बंद होण्याची भीती, पिंपरी चिंचवड महापालिकेने थकवली पीएमपीची रक्कम

पुणे : पीएमपीची सुरू असलेली अत्यावश्यक सेवेतील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण सीएनजीने पीएमपी प्रशासनास थकीत रक्कम लवकर भरा अन्यथा तुमचा पुरवठा बंद करू अशी नोटीस दिली आहे. संचारबंदीच्या काळात पीएमपीचे अर्थचक्र पूर्णपणे थांबले आहे. त्यातच पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीचे देखील देणी थकविले असल्या कारणाने पीएमपीवर ही नामुष्की ओढावली आहे. 

संचारबंदीमुळे पीएमपीची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील घटकांसाठी सुरू आहे. यात केवळ ११८ गाड्या दररोज धावत आहे. यातून मिळणारे उत्पन्न देखील कमी आहे. पुणे महापालिका २० कोटी तर पिपरी चिंचवड महापालिका १८ कोटी ह्या अत्यावश्यक सेवेच्या बिलापोटी देणे आहे. यात पुणे महापालिकेने २० कोटींची रक्कम पीएमपीला दिली आहे तर पिपरी चिंचवड कडून अद्याप येणे बाकी आहे. ही रक्कम लवकर नाही मिळाली तर सिएनजी चा पुरवठा तर खंडित होईलच शिवाय मे महिन्यातील पीएमपी च्या कर्मचाऱ्याच्या वेतनावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. ......सीएनजी चे ५२ कोटी थकले...…सीएनजी वर पीएमपीचे बहुतांश गाडया धावतात.पैकी सध्या ११८ गाडया अत्यावश्यक सेवेत धावत आहे. सीएनजी पुरवठा बदल्यात पीएमपी ५२ कोटी रुपये देणे लागते. ती रक्कम थकल्याने सीएनजी ने बुधवारी पीएमपी ला नोटीस बजावली आहे.त्यात थकीत रक्कम भरा अन्यथा इंधन पुरवठा बंद करू असे म्हटले आहे. ...... पीएमपीला सीएनजीची नोटीस मिळाली असून थकीत रक्कम लवकर अदा करावी असे सांगितले आहे.पीएमपी ची आर्थिक स्तिथी सध्या नाजूक आहे. पुणे महापालिकेनी आपली रक्कम दिली असून पिपरी चिंचवड महापालिकेकडून अद्याप येणे बाकी आहे. अशीच स्तिथी राहिली तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. - डॉ.चेतना केरुरे, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड