शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

३० लाख खंडणी दे, नाहीतर मारुन टाकतो! भंगार व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 19:05 IST

पाच दिवस आधीच केली रेकी...

पिंपरी/सासवड : भंगार व्यवसायकीच्या १४ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून फोन करत ‘‘३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडून त्यास मारुन टाकतो.” अशी धमकी दिली. मात्र, अवघ्या अडीच तासात गुन्हे शाख युनिट चारच्या पथकाने अपहरण करणाऱ्यांना अटक करत मुलाची सुटका केली. अटक केलेल्या संशयितांची नावे तेजस ज्ञानोबा लोखंडे ( वय २१ ), अर्जुन सुरेश राठोड (१९, दोघे रा. दत्त मंदिर शेजारी, मारुंजीगाव) विकास संजय मस्के (२२ रा. शिवार वस्ती, भुमकर चौक) अशी आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि.१२) करण्यात आली. हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने मुलाचे अपहरण केल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे कारमधून तीन जणांनी अपहरण सकाळी सातला केल्याची माहिती पोलिस हवालदार मोहम्मद गौस नदाफ यांना माहिती मिळाली. हा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी याबाबत आपल्या वरिष्ठांना सुचित केले. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-४ चे सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी मुलाचे अपहरण केले ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात तीन व्यक्ती हे एका निळया रंगाचे झेन गाडीमध्ये अपहरण केलेल्या मुलास घेऊन जात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाच्या काकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून माहिती काढण्यास सांगितले. त्याच दरम्यान मुलाच्या काकास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन अपहरणकर्त्याने “३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडून त्यास मारुन टाकतो" अशी धमकी दिली.

पोलिसांनी त्या फोनचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी ताथवडे येथून सासवडच्या दिशेने जात असल्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. सासवड पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी लावली. त्या नाकाबंदीमध्ये सासवड पोलिसांना तीनजण संशयितरित्या एका कारमधून जात असताना दिसले. सासवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अपहरण झालेल्या १४ वर्षीय मुलाची सुटका केली. 

पाच दिवस आधीच केली रेकी- 

पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यातून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, एक छऱ्याचे पिस्टल, कोयता, सुरा, छन्नी, हातोडा असा ऐवज आढळून आला. आरोपींनी पाच दिवस परिसराची रेकी केली. त्यानंतर मुलाचे अपहरण केले. आरोपींना हॉटेल व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना पैशांची कमतरता होती. म्हणून त्यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस