क्रांतिगुरु लहुजी स्मारकाच्या कामाबद्दल पवारांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:12 IST2021-03-26T04:12:53+5:302021-03-26T04:12:53+5:30

पुणे : संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक जलदगतीने सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार ...

Pawar's instructions regarding the work of Krantiguru Lahuji memorial | क्रांतिगुरु लहुजी स्मारकाच्या कामाबद्दल पवारांच्या सूचना

क्रांतिगुरु लहुजी स्मारकाच्या कामाबद्दल पवारांच्या सूचना

पुणे : संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक जलदगतीने सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजकल्याण आयुक्त, भूमी संपादन अधिकारी यांना दिले आहेत.

महापालिकेचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप, नगरसेवक अविनाश बागवे यांनी गुरुवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी राजाभाऊ धडे, सचिन जोगदंड, भास्कर नेटके, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे उपस्थित होते.

पवार यांनी साळवे राष्ट्रीय स्मारकासंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. भूमी संपादनासाठी आवश्यक १०० टक्के निधीचा प्रस्ताव तयार करून तो तातडीने राज्य सरकारकडे पाठवण्याचा आदेश महापालिकेस दिला. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेला विषय लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

Web Title: Pawar's instructions regarding the work of Krantiguru Lahuji memorial