यवत मुस्लिम दफनभूमीत पेव्हर ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:59+5:302021-07-14T04:13:59+5:30
यवत ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून दफनभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक व पाण्याची टाकी बांधण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांच्या निधीची ...

यवत मुस्लिम दफनभूमीत पेव्हर ब्लॉक
यवत ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून दफनभूमीमध्ये पेव्हर ब्लॉक व पाण्याची टाकी बांधण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भूमिपूजन कार्यक्रमास मुस्लिम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते मुबारक शेख, ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, तालुका दक्षता समिती सदस्य अल्ताफ शेख, दौंड तालुका काँग्रेस आय अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष मोसीन तांबोळी, दौंड तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अरविंद दोरगे, युवा कार्यकर्ते अब्रार शेख, फय्याज तांबोळी, जावेद बेग, आरिफ तांबोळी, मुदस्सर तांबोळी, ताहीर शेख, अय्यूब मोगल, ताज अन्सारी व इतर मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते.
युवा मुस्लिम कार्यकर्त्यांनी सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव व ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी व ग्रामपंचायत प्रशासन यांचे दफन भूमीतील कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
मुस्लिम समाजातील लग्न कार्यासाठी सभागृह करण्यासाठी प्रयत्नशील : इम्रान तांबोळी
ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी यांनी यावेळी लोकमतशी बोलताना भविषयात आमदार राहुल कुल व सरपंच समीर दोरगे यांच्याकडे पाठपुरावा करून दफनभूमीतील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तसेच मुस्लिम समाजातील लग्न कार्यासाठी सभागृह बांधण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेणार असल्याचे सांगितले.
यवत येथील मुस्लिम दफनभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करताना उपसरपंच सुभाष यादव, अनमुद्दीन तांबोळी, मुबारक शेख, इम्रान तांबोळी आदी कार्यकर्ते.