शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाटील इस्टेट झोपडपट्टीचे पुनर्वसन सीओईपी करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 11:42 IST

पाटील इस्टेट झोपडपट्टीला प्रचंड मोठी आग लागून तब्बल शंभर झोपड्या जळून खाक झाल्या.

ठळक मुद्देप्रस्ताव शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाकडेया जागेवर तब्बल ११०० झोपड्या असून, लोकसंख्या ७ हजारांच्या पुढे खासगी जागेवर झालेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी विकसकाला बेनिफिट देण्याचा निर्णय

पुणे : सीओईपीच्या जागेवर अतिक्रमण करून पाटील इस्टेट झोपडपट्टी उभी राहिली आहे. त्यामुळे एसआरए योजने अतंर्गत झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात अडचण येत आहे. परंतु आता नवीन अध्यादेशानुसार सीओईपीनेच पाटील इस्टेट झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सीओईपीच्या वतीने या जागेवर झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यासाठी परवानगी मिळावी, असा प्रस्ताव शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविला आहे.पाटील इस्टेट झोपडपट्टीला प्रचंड मोठी आग लागून तब्बल शंभर झोपड्या जळून खाक झाल्या. बुधवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रश्न समोर आला. परंतु सीओईपीच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटील इस्टेट झोपडपट्टीची जागा ही सीओईपीच्या मालकीची आहे. तब्बल ५ एकर जागेवर अतिक्रमण करून येथे ही झोपडपट्टी उभी राहिली आहे. या जागेवर तब्बल ११०० झोपड्या असून, लोकसंख्या ७ हजारांच्या पुढे गेली आहे.  या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन स्कीम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला सीओईपीने आक्षेप घेतला होता. ही त्यांची खासगी जागा असल्याने त्यांनी हा निर्णय घेत न्यायालयाचे दार ठोठावले होते. दरम्यान, खासगी जागेवर झालेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी विकसकाला बेनिफिट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे या ठिकाणी स्वत:च विकसक म्हणून पुनर्वसनाची योजना करण्याला सीओईपी तयार झाली आहे.  त्यांनी त्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली असून, त्यांचा हा प्रस्ताव तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवला आहे. तेथे परवानगी मिळाल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणही त्याला तत्काळ मंजुरी देणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. ती मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया करून, येथील काम सुरू होण्याची शक्यता आहे. या झोपडपट्टीमध्ये याआधीही आगीची घटना घडली आहे. तसेच शहरातील अन्य झोपडपट्ट्यांमध्येही वारंवार अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एसआरएच्या स्कीम लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र त्यासाठी झोपडपट्टीवासियांनीही पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचेही मत यावेळी अधिका-यांनी व्यक्त केले. पाटील इस्टेट झोपडपट्टीच्या विषयात सीओईपीच यामध्ये स्कीम करणार असल्याने फारसा विरोध होणार नाही, अशी आशाही अधिका-यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेfireआगGovernmentसरकार