पुरंदर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने रुग्णांची लूट थांबली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:22+5:302021-04-25T04:10:22+5:30

नोबेल पुरंदर हेअर हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी मात्र शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने सिटी स्कॅनकरिता दर आकारण्यात ...

Patient administration intervened to stop the looting of patients. | पुरंदर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने रुग्णांची लूट थांबली.

पुरंदर प्रशासनाच्या हस्तक्षेपाने रुग्णांची लूट थांबली.

नोबेल पुरंदर हेअर हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी मात्र शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने सिटी स्कॅनकरिता दर आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. मार्च २०२१ व एप्रिल २०२१ या दोन महिन्यांत नोबेल हेल्थ केअर सेंटरमध्ये एचआर सिटी स्कॅनकरिता आकारण्यात आलेल्या दराची तपासणी केली असता शासनाने ठरवून दिलेल्या अडीच हजार दरापेक्षा जास्त दर आकारण्यात आलेला दिसून आला. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर यांना लेखी पत्र व बिले सादर करून योग्य कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

या तपासणीचा धसका घेऊन पुरंदर हेल्थ केअर सेंटर यांनी लगेच याच्यावर सिटी स्कॅनचा दर अडीच हजार रुपये केल्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली तसेच यापूर्वी ज्या लोकांचे जास्त पैसे घेतले, त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. काही लोकांचे पैसेदेखील परत करण्यात आले आहेत. ज्यांनी अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले आहेत त्यांनी वाढीव रक्कम नोबेल हेल्थ केअर सेंटरमध्ये जाऊन परत घ्यावी, असे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Patient administration intervened to stop the looting of patients.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.