पाटसला घरफोड्या

By Admin | Updated: October 21, 2014 05:19 IST2014-10-21T05:19:22+5:302014-10-21T05:19:22+5:30

पाटस (ता. दौंड) येथे घरफोडीचे सत्र सुरू असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Patels burglary | पाटसला घरफोड्या

पाटसला घरफोड्या

पाटस : पाटस (ता. दौंड) येथे घरफोडीचे सत्र सुरू असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शनिवार (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास गावात भरवस्तीत असलेल्या घरातील एका महिलेला मारहाण करून चार अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास योगेंद्रनगर येथे ४ शिक्षकांच्या घरांचे कुलूप तोडून २२ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. दरम्यान, या चोरीप्रकरणी संतोष चव्हाण (वय ३२, रा. वलगूर, ता. श्रीगोंदा, जि. नगर) याला अटक करण्यात आली असून, त्याचे तीन उर्वरित साथीदार फरार आहेत. परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाने आरडाओरडा केल्याने काही मंडळी मदतीला धावून आली. त्या वेळी संतोष चव्हाण याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, तर उर्वरित तीन जण फरार झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Patels burglary