शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

देवतारी त्याला कोण मारी; बाळाला बेवारसपणे सोडणाऱ्या आई वडिलांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 19:14 IST

'भगवान के घर दर है लेकीन अंधेर नहीं' याचा प्रत्यय आला असून पोलिसांनी अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला मरणासन्न अवस्थेत सोडून पसार झालेल्या आई वडिलांना शोधून अखेर अटक केली आहे.

सासवड : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाचे संगोपन कसे करावयाचे व हे मुल घेवून समाजात कसे वावरणार,या भितीपोटी जोडप्याने लहान बाळास  दोघांनी मिळून त्यास एका कापडात गुंडाळून त्याला जवळच्याच पोल्ट्री शेड मध्ये मरणासन्न अवस्थेत सोडून दोघेही पसार झाले. परंतु म्हणतात ना, 'भगवान के घर दर है लेकीन अंधेर नहीं' याचा प्रत्यय आला असून पोलिसांनी अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला मरणासन्न अवस्थेत सोडून पसार झालेल्या आई वडिलांना शोधून अखेर अटक केली आहे.

  दत्तात्रय हरिभाऊ भोसले हे ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास परिंचे - हरणी रोडवरील कासारवड येथील त्यांच्या शेतात गेले असता त्यांना त्यांच्या गोठ्याचे पत्र्याच्या शेडमधून एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी त्यांनी जवळ जावून पहिले असता एक साधारण १५ दिवस वयोमान असलेले बालक सोडून गेल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी पोलीस पाटील यांना फोन करूनही  माहिती दिल्यानंतर त्यास परींचे येथिल  दाखल रुग्णालयात करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून नंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल नीता दोरगे यांनी पुणे येथील ससून रुग्णालय मधील बालक केंद्रात दाखल केले. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी घटनेचा कसून तपास केल्यानंतर थोड्याच दिवसांत बाळाची आई मिळून आली. तिला ताब्यात घेवून चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे देवून या घटनेशी संबंध नसल्याचे सांगितले.

 पोलिसांनी महिलेची डीएनए तपासणी केल्यावर संबंधित महिलाच या बाळाची आई असल्याची खात्री झाली. त्यानंतर तिला पोलिसी खाक्या दाखविताच पटापट माहिती दिली. तिने सांगितले कि, ती पतीपासून अनेक महिने विभक्त आहे, ती एका शेतात कामाला होती. तेथे असणाऱ्या एका व्यक्ती बरोबर तिचे संबंध जुळून आले व त्यातूनच दिला दिवस गेले. परंतु अशा अवस्थेत बाहेर पडल्यास सर्वाना माहिती होईल. त्यामुळे एकाच ठिकाणी राहू लागली. एवढेच काय पण संबंधित व्यक्तीनेच तिचे बाळंतपण केले. बाळ सुखुरूप जन्माला आले. परंतु असे किती दिवस लपून राहणार म्हणून त्यांनी त्या बाळाला सोडून देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी संबंधित महिलेच्या प्रियकरालाही ताब्यात घेवून अटक केली आहे.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस