परशा जाधव खून; आणखी 4 जण अटकेत
By Admin | Updated: June 27, 2014 00:40 IST2014-06-27T00:40:46+5:302014-06-27T00:40:46+5:30
सराईत गुन्हेगार परशा ऊर्फ परशुराम जाधव याच्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आणखी 4 जणांना अटक केले.

परशा जाधव खून; आणखी 4 जण अटकेत
>पुणो : सराईत गुन्हेगार परशा ऊर्फ परशुराम जाधव याच्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आणखी 4 जणांना अटक केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. भोर यांनी या चौघांना 2 जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
कुंदन बाबूराव घाडगे (वय 26, रा. इंदिरानगर, मूळ गाव बोडखा, जि. लातूर), रूपेश विठ्ठल दळवी (वय 27, रा. राजेंद्रनगर, मूळगाव र}ागिरी), लक्ष्मण महादेव जानराव (वय 29, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळगाव सोलापूर), सचिन लहू अडागळे (वय 27, रा. राजेंद्रनगर, मूळगाव अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
बाळू ऊर्फ शिवाजी चौधरी व आरोपींनी परशा जाधव याचा जमीन दाखविण्याच्या बहाण्याने निंबाळकरवाडी येथे नेऊन खून केला. अटक आरोपी यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. जमिनीच्या वादातूनच हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बाळू चौधरी व आणखी तिघांचा पोलिसांना तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
(प्रतिनिधी)