शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

देशात लसीकरण, प्रतिबंधनात्मक उपचारांमध्ये मुलींना दुजाभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 8:49 PM

न्युमोनिया व अतिसार या आजारांनी सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या भारतासह १५ देशांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देया दोन आजारांमुळे २०१६ मध्ये जगभरात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू

पुणे : भारतात पाच वर्षाखालील मुलांचे न्युमोनिया आणि अतिसारापासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न कमी पडत असल्याचे एका जागतिक अहवालावरून समोर आले आहे. तसेच लसीकरण तसेच इतर प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये मुलगा व मुलगी असा दुजाभाव होत असल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. न्युमोनिया अ‍ॅण्ड डायरिया प्रोग्रेस रिपोर्ट जॉन्स हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल आॅफ पब्लिक हेल्थमधील इंटरनॅशनल वॅक्सिन अ‍ॅक्सेस सेंटरने (आयव्हीएसी) नुकताच हा अहवाल प्रसिध्द केला आहे. न्युमोनिया व अतिसार या आजारांनी सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या भारतासह १५ देशांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. मूल्यांकन केलेल्या १५ देशांपैकी आठ देश न्युमोनिया व डायरियापासून संरक्षण तसेच या आजारांवर उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटना तसेच युनिसेफच्या न्यूमोनिया व अतिसार प्रतिबंध व नियंत्रणासाठीच्या एकात्मिक जागतिक कृती योजनेने (जीएपीपीडी) घालून दिलेल्या १० उपायांची पूर्तता करण्यातच कमी पडत आहेत. स्तनपान, लसीकरण, वैद्यकीय सेवेची उपलब्धता, प्रतिजैवकांचा वापर, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) व झिंक देणे आदींचा उपायांचा त्यात समावेश होतो. २०१६ मध्ये जगभरात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू या दोन आजारांमुळे झाले होते. यावर्षी भारतात सर्वाधिक २ लाख ६० हजार ९९० मृत्यू झाले होते. त्यामध्ये १ लाख ५८ हजार १७६ मुलांचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. भारतात हिमोफिलिअल इन्फ्लुएंझा टाइप बी लशींची व्याप्ती वाढवून तसेच रोटाव्हायरस लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. २०१७ मध्ये आणलेले न्युमोकोकल काँज्युगेट वॅक्सिन (पीव्हीसी) सर्व राज्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार झाला पाहिजे. तसेच स्तनपानाबाबत तसेच ओआरएसच्या प्रसाराबाबत भारताचे गुण कमी झाले आहेत. केवळ २० टक्के मुलांना अतिसारासाठी ओआरएस उपचार मिळत असून एकूण मुलांना महत्त्वाचे उपचार मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला