बोधकथा : समर्पण व बलिदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:17+5:302021-06-18T04:08:17+5:30
लष्कराच्या गोरखा रायफल्सचे मुनिंद्रनाथ प्रमुख सदस्य. अतिरेक्यांना नेटाने तोंड देण्यात ते अत्यंत माहीर होते. काश्मीरमधील हुंडरा गावात हिज्बुल मुजाहिदीनचे ...

बोधकथा : समर्पण व बलिदान
लष्कराच्या गोरखा रायफल्सचे मुनिंद्रनाथ प्रमुख सदस्य. अतिरेक्यांना नेटाने तोंड देण्यात ते अत्यंत माहीर होते. काश्मीरमधील हुंडरा गावात हिज्बुल मुजाहिदीनचे दोन अतिरेकी लपले होते. तिथे पोहचलेल्या लष्कर आणि पोलीस यांच्या या संयुक्त मोहिमेचे नेतृत्व मुन्ना राय यांनी शिरावर घेतले. कारण, धाडस आणि शौर्य याचे ते प्रतीक होते. ‘शत्रूवर कारवाई करताना ज्या तुकडीचे नेतृत्व करतो तिथे अधिकारी या नात्याने आपणच आघाडीवर असायला पाहिजे’, अशी त्यांची भावना होती. कारवाईत त्यांच्या तुकडीने धाडसाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला; पण दुर्दैवाने त्या वेळी उडालेल्या चकमकीत ते हुतात्मा झाले.
‘युद्धसेवा पदक’ मिळाल्याचा आनंद व लग्नाचा वाढदिवस आपल्यासोबत साजरा व्हावा, अशी कुटुंबीयांची इच्छा अपूर्णच राहिली.
देशाची सेवा करताना शत्रूशी दोन हात करत आपल्या वैयक्तिक सुख-दुःखांना तिलांजली देणारे असे भारतमातेचे सुपुत्र व त्यांच्या कुटुंबीयांच्या समर्पण, बलिदान व त्यागाला खरोखरच तोड नाही.
- प्रसाद भडसावळे