शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पानवेलींना फटका

By admin | Updated: August 18, 2015 03:42 IST

निमगाव केतकी परिसरातील पानउत्पादक शेतकरी पानाचे बाजारभाव ढासळल्याने हवालदिल झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये गबाळ पानाच्या डागाची विक्री ३०० रुपये

निमगाव केतकी : निमगाव केतकी परिसरातील पानउत्पादक शेतकरी पानाचे बाजारभाव ढासळल्याने हवालदिल झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये गबाळ पानाच्या डागाची विक्री ३०० रुपये, तर ती पाने बाजारात पोहोचण्यासाठी खर्च ५०० रुपये होत आहे.गेल्या ७०-८० वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावाबरोबरच परिसरातील पिटकेश्वर, सराफवाडी, गोतोंडी, वरकुटे खुर्द, शेळगाव, बनकरवाडी, पळसदेव, कालठण, व्याहळी, कौठळी, माळवाडी आदी गावांमधील बहुतांश शेतकरी पानवेलींची शेती करतात.पानवेलींचे मळे जोपासणे सध्याच्या काळात अतिशय जिकिरीचे झाले आहे. तरीही, या भागातील शेतकरी चिकाटीने मळे फुलवतात. या पानवेलीच्या लागवडीपासून ते पानांचा मळा सुरू होईपर्यंत भरपूर खर्च करावा लागतो. पानवेलीची लागवड करीत असताना प्रथम शेणखत एकरी ६ ते ८ टेलर टाकावे लागते. यासाठी किमान ४० ते ४५ हजारांच्या आसपास खर्च होतो. या शेतात मशागत करणे व वाफे बनवणे, यासाठी किमान ४ ते ५ हजार खर्च होतो. या एका वेलाची किंमत ७ ते १० रुपये एवढी असते. साधारणत: आर्धा एकर पानवेलीची लागण करण्यासाठी २० ते २२ हजार रुपये खर्च करावा लागतो. या भागामध्ये पाण्याची टंचाई असल्याने अनेक शेतकरी सुरुवातीपासूनच ठिंबक सिंचन करतात. यासाठी १५ हजारांपर्यंत खर्च करावा लागतो. पानवेलीची लागवड करताना अर्धा एकरासाठी जवळपास १ लाख ते दीड लाख रुपये एवढा खर्च करावा लागतो. परंतु, सुरुवातीला मुबलक पाणी असलेल्या विहिरी व बोरवेल शेजारी इतर बोरवेल व विहिरी झाल्याने पाणी कमी होते. पाने खुडणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाल्याने मंजुरी खर्चामध्ये वाढ झाली आहे. पानांना मिळणारा बाजारभाव कमी झाला आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. गबाळ जातीच्या पानांची खुडणी करणे व विक्रीसाठी बाजारात नेणे यासाठी ५०० रुपयांच्या आसपास खर्च होतो. मात्र, त्याची विक्री ३०० रुपयांपर्यंत होत आहे. यामुळे पानउत्पादकांना फटका बसत आहे. शेज जातीची पाने ८०० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत विकली जात आहेत. (वार्ताहर)