पंकज, शिल्पाला अपेक्षित विजेतेपद
By Admin | Updated: August 19, 2014 00:33 IST2014-08-19T00:33:56+5:302014-08-19T00:33:56+5:30
अव्वल मानांकित मुंबईच्या पंकज पवार आणि शिल्पा पलनीटकर यांनी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अपेक्षेप्रमाणो अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.

पंकज, शिल्पाला अपेक्षित विजेतेपद
मुंबई : अव्वल मानांकित मुंबईच्या पंकज पवार आणि शिल्पा पलनीटकर यांनी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अपेक्षेप्रमाणो अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणा:या पंकजने पुण्याच्या माजी सार्क विजेत्या प्रकाश गायकवाडचे तगडे आव्हान 25-क्, 5-25, 25-5 असे परतवून लावले. तिस:या स्थानासाठीच्या सामन्यात मुंबईच्या मोहम्मद साजीदला पुण्याच्या वसंत वैराळने राखलेल्या वर्चस्वापुढे 19-25, 8-25 अशी शरणागती पत्करावी लागली.
महिलांच्या गटात तीन गेमर्पयत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात शिल्पाने अग्रमानांकित संगीता चांदोरकरला कोणतीही संधी न देता 25-12, 11-25, 25-8 अशी बाजी मारली. मुंबईच्या अंजली सिरीपुरमने पुण्याच्या मेधा मतकरीचा 25-1क्, 25-15 असा धुव्वा उडवत तिसरे स्थान पटकावले. पंकज व शिल्पाला करंडकासह अनुक्रमे रोख रक्कम 8क् हजार व 4क् हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
(क्रीडा प्रतिनिधी)