दावडी येथील किल्ल्यात पानिपत शौर्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:09 IST2021-01-15T04:09:51+5:302021-01-15T04:09:51+5:30
किल्ल्यातील गायकवाड यांच्या राजवाड्यात श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या गादीला मानवंदना देण्यात आली. मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत 'रणधुरंदर' लढाई कुठली मानली ...

दावडी येथील किल्ल्यात पानिपत शौर्य दिन साजरा
किल्ल्यातील गायकवाड यांच्या राजवाड्यात श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या गादीला मानवंदना देण्यात आली.
मराठ्यांच्या इतिहासात सर्वांत 'रणधुरंदर' लढाई कुठली मानली जाते, तर ती पानिपतची लढाई. कारण ही लढाई मराठेशाही हरून देखील जिंकल्यासारखे आहे. त्यामुळे १४ जानेवारी हा दिवस पानिपत शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. खऱ्या अर्थानं दावडी गाव हे एक ऐतिहासिक असून या गावचा इतिहास लिहिण्याचे काम खऱ्या अर्थाने गायकवाड घराण्यानं केलं आणि याचा वारसा जपण्यासाठी म्हणून दावडी गावात पानिपत शौर्य दिन म्हणून साजरा केला. या वेळी इतिहास संशोधक प्रवीण गायकवाड यांनी गायकवाड आडनावाच्या उत्पत्तीचा इतिहास सांगितला. तसेच, या वेळी शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक लखन जाधव व सहकारी यांनी दाखवले खऱ्या अर्थानं मराठेशाहीला एक मानवंदना देण्याचं काम केलं. या कार्यक्रमाचं आयोजन श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान व शिवशंभू प्रतिष्ठान दावडी यांनी केले. यावेळी अमृतराज गायकवाड, प्रवीण गायकवाड, सुरेश डुंबरे, सुधीर गायकवाड, बाबासाहेब दिघे, प्राचार्य अंकुश केंगारे, सचिन उढाणे व अनेक शिवभक्त उपस्थित होते.
१४दावडी
दावडी येथे किल्यात पानिपत शौर्य दिन म्हणून साजरा करुन शिवकालीन युद्धकला सादर करण्यात आली.