शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांमुळेच देशात अराजकाची परिस्थिती: बी.जी.कोळसे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 21:24 IST

गुन्हे थांबवायचे असतील तर गुन्हेगारांना मारायची नव्हे, तर गुन्ह्याविषयी चर्चा करुन तोडगा काढा..

ठळक मुद्दे‘भय इथले संपत नाही- हैद्राबाद व उन्नाव बलात्कार प्रकरणी न्याय’ या विषयावर व्याख्यान

पुणे : गुन्हे थांबवायचे असतील तर गुन्हेगारांना मारायची नव्हे, तर गुन्ह्याविषयी चर्चा करुन तोडगा काढण्यावर भर हवा. व्यक्ती अमानवीय तेव्हाच होतो जेव्हा सामाजिक परिस्थिती अमानवीय होते. समाजाच्या या अवस्थेस मनुवादी पुरुषसत्ताक व्यवस्था कारणीभूत आहे. आज देशातील अराजक परिस्थिती ही सत्ताधारी राजकीय वर्गाने पसरवली आहे,’ असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.अभिव्यक्ती संघटनेतर्फे ‘भय इथले संपत नाही- हैद्राबाद व उन्नाव बलात्कार प्रकरणी न्याय’ या विषयावर भारत इतिहास संशोधक मंडळ येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळेस माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अलका जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.अलका जोशी म्हणाल्या, ‘देशभरात महिलांविरोधात, अल्पवयीन मुलींविरोधात होणा-या हिंसाचाराने उच्चांक गाठला आहे. बलात्कार आणि हत्यांच्या घटनांनी लोकांमध्ये अस्वस्थता, नैराश्य आणि संताप निर्माण केला आहे. स्त्रियांवरील हिंसा शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक अशा अनेक प्रकारे केली जाते. स्त्री म्हणून दिली जाणारी दुय्यम वागणूक, भेदभाव, सतत नियंत्रण ठेवणे, निर्णय घेऊ न देणे, स्वातंत्र्य नाकारणे ही देखील हिंसाच आहे.’ ‘गेल्या काही वर्षात भांडवली बाजार व्यवस्थेने समाजातील पितृसत्तेला खतपाणी दिले आहे. विविध जाहिरातींमधून अधिक नफा कमावण्यासाठी स्त्री देहाचा बाजार मांडला आहे. आपण पितृसत्तेशी लढा देण्याबद्दल बोलतो, तेव्हा तिचा समूळ नाश भांडवलशाहीच्या नाशाबरोबरच होऊ शकतो. समाजामध्ये स्त्रीला समानतेची वागणूक मिळावी आणि तिचा आत्मसन्मान व स्वायतत्ता जोपासली जाईल असे वातावरण तयार व्हावे’, असे मतही त्यांनी व्यक्त केले.पूनम मंगल यांनी सूत्रसंचालन केले. लोकायत संघटनेची सांस्कृतिक आघाडी असलेल्या ‘काफीला’ने कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी लोकायतचे निरज जैन, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMolestationविनयभंग