शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गलांडवाडीत मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने घबराट; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:39 IST

शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले त्यांचे पुतणे प्रवीण देडगे यांना हे पिल्लू मृत अवस्थेत आढळले.

केडगाव - दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे आज सकाळी ७ वाजता एका शेतात मृत बिबट्याचे पिल्लू आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी विजय देडगे यांच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले त्यांचे पुतणे प्रवीण देडगे यांना हे पिल्लू मृत अवस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ शेजारील शेतकरी अनिल राजगुरू, राजू थोरात, संजय खैरे यांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच रमेश पासलकर यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनरक्षक वीरेंद्र लंकेश्वर, वनपाल अंकुश खरात आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर राहुल काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सुरुवातीचा अंदाज व्यक्त केला की, परिसरात पाण्याची टंचाई आणि ऊसतोड झाल्याने लपण्यासाठी जागा उरलेली नाही. भक्षाच्या शोधात बिबट्यांमध्ये झटापट होऊन किंवा विषारी भक्षामुळे पिल्लाचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.शेतात तारेचे कुंपण असूनही बिबट्याचे पिल्लू आणि त्याची मादी आत कशी आली, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिसरात तात्काळ पिंजरा लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्या