शेतकऱ्यांच्या मुलांना पाणी फाउंडेशनने व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे : बाबाराजे जाधवराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:18 IST2021-02-18T04:18:24+5:302021-02-18T04:18:24+5:30
गराडे : पाणी फाऊंडेशनचे काम सर्वत्र सुरू आहे. परंतु या कामावर आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना किती दिवस गुंतवणार आहे. पाणी ...

शेतकऱ्यांच्या मुलांना पाणी फाउंडेशनने व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे : बाबाराजे जाधवराव
गराडे : पाणी फाऊंडेशनचे काम सर्वत्र सुरू आहे. परंतु या कामावर आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना किती दिवस गुंतवणार आहे. पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये शहरातील लोकांनी येऊन मदत करावी.याकामासाठी यंत्रसामग्री सध्या उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी यंत्रसामग्री नव्हती. त्यामुळे लोकसहभाग महत्त्वाचा होता. त्यामुळे आता गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी पाणी फाउंडेशनच्या कामावर जाऊ नये. शेतकऱ्यांच्या मुलांना आमिर खान यांनी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन पुढे केले पाहिजे, असे आवाहन भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी केले.
काळेवाडी येथे दिवे व झेंडेवाडी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार व हळदीकुंकू समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबाराजे जाधवराव बोलत होते. अध्यक्षस्थानी अँड. बाजीराव झेंडे होते.
या वेळी कात्रज दूध उत्पादक संघाचे संचालक गंगाराम जगदाळे, माजी जि. प. सदस्या संगीता काळे, काँग्रेस नेते प्रकाश पवार, दिलीप झेंडे, बाळासाहेब काळे, दिवे सरपंच अमित झेंडे, उपसरपंच सुजाता जगदाळे, झेंडेवाडी सरपंच पूनम झेंडे, उपसरपंच कौसल्या झेंडे, गुलाबतात्या झेंडे, बाळकृष्ण खटाटे, सोनाली झेंडे, मीना झेंडे, भिकन खटाटे, बाप्पू टिळेकर, मीना लडकत, दत्तात्रेय झेंडे, प्रशांत झेंडे, बबन कटके, सोमनाथ झेंडे, रमाकांत काळे, गणेश काळे, पंढरीनाथ पोपळे,गणपत शितकल, बापू राऊत, दिनकर गायकवाड, भाऊसो झेंडे, नामदेव झेंडे, अविनाश झेंडे,किशोर काळे आदींसह सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, दिवे व झेंडेवाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गंगाराम जगदाळे म्हणाले, दादासाहेब जाधवराव यांचे चांगले विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. यापुढे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी बाबाराजे जाधवराव यांनी आम्हाला आदेश द्यावेत. सर्वसामान्य लोकांची सत्ता परत मिळवून ताकद दाखवू.
यावेळी दिवे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच अमित झेंडे म्हणाले, की गावचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न यापूर्वी देखील केलेले आहेत व आता यापुढे देखील करणार आहोत. दिवे ग्रामपंचायतीचे चावडी सुधारण्यासाठी वीस लक्ष रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे.
काँग्रेसचे नेते प्रकाश पवार म्हणाले, सर्वसामान्य लोकांची कामे केली तर लोक तुम्हाला विसरत नाहीत.
झेंडेवाडी उपसरपंच कौशल्या झेंडे म्हणाल्या, झेंडेवाडीच्या पाणीप्रश्नावर लक्ष देण्याची गरज आहे.
अॅड. बाजीराव म्हणाले, निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांनी आदर्शवत काम करावे.
बाळासाहेब काळे, गुलाब झेंडे, शिवाजी खटाटे, प्रदीप पानखडे यांनीही मनोगते व्यक्त केली.
प्रास्तविक गुलाब झेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश काळे यांनी केले. तर आभार गणपत शितकल यांनी मानले.
काळेवाडी (ता. पुरंदर) येथे सरपंच, उपसरपंच सत्कारप्रसंगी भाजपानेते बाबाराजे जाधवराव व इतर मान्यवर.