पुुणे : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने शनिवार (दि. २१) पासून विशेष रेल्वेसेवा सुरू केली. दि. २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर मुक्ता टिळक व रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी पुणे रेल्वे स्थानकावर पहिल्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक गौरव झा आदी उपस्थित होते. पुणे-पंढरपुर मार्गावर डेमु रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी दररोज सकाळी ६.१५ वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून पंढरपुरकडे रवाना होईल. ही गाडी पंढरपुरमध्ये दुपारी एक वाजता पोहचून दुपारी ३ वाजता पुण्याकडे प्रस्थान करेल. रात्री ८.३५ वाजता गाडीचे पुणे स्थानकावर आगमन होईल. ही गाडी हडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भिगवण, पारेवाडी, जेऊर, कुर्डूवाडी, मोडलिंब याठिकाणी थांबे असतील.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 21:31 IST
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी २५ जुलैपर्यंत पुणे व पंढरपुर येथून ही दररोज ही सेवा सुरू राहणार असल्याने भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुर रेल्वेसेवा सुरू
ठळक मुद्देहडपसर, मांजरी बुद्रुक, लोणी, उरळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, भिगवण, जेऊर, कुर्डूवाडी, याठिकाणी थांबे