शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

पिंपरी-चिंचवडमध्ये पॅनसिटीचा डीपीआर मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:49 PM

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौथी बैठक सोमवारी महापालिका भवनात झाली. त्यात पॅनसिटीच्या डीपीआरला मंजूरी दिली असून पब्लिक सायकल शेअरींग, कमाडंन्ट कंट्रोल सेंटर, सोलर रूफ टॉफ, शाळांमध्ये ई- लर्निंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंचालक मंडळाची बैठक : निविदा प्रक्रिया होणार सुरूपीएनवाय या सल्लागार संस्थेची नियुक्त केली जाणार

पिंपरी : स्मार्ट पाणी वाटप, स्मार्ट वाहतूक, स्मार्ट सिग्नल, जीपीएस द्वारे सर्वेक्षण, स्मार्ट पर्यावरण, मोबाईल अ‍ॅपची निर्मिती केली जाणार आहे. पॅन सिटी प्रकल्पाचा डीपीआर मंजूर करण्यात आला. त्यासाठी पीएनवाय या सल्लागार संस्थेची नियुक्त केली जाणार आहे. महापालिका व पोलीस यंत्रणा यांच्यासाठी कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर तयार करण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात ही कामे केली जाणार आहेत. या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्याचे काम सुरू होईल. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौथी बैठक सोमवारी महापालिका भवनात झाली. त्यात पॅनसिटीच्या डीपीआरला मंजूरी दिली असून पब्लिक सायकल शेअरींग, कमाडंन्ट कंट्रोल सेंटर, सोलर रूफ टॉफ, शाळांमध्ये इलर्निंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तांवाना संचालक मंडळाने मंजूरी दिली. या स्मार्ट सिटीच्या बैठकीस प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाचे संचालक आर. के. सिंग, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, संचालक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे उपस्थित होते.तज्ञ समिती नेमणारस्मार्ट सिटीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असणारा सल्लागार समिती नेमण्यात येणार असून त्यात खासदार, आमदार, कॉलेजचे संचालक, विविध सामाजिक संस्था, उद्योगांचे प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. समिती नेमण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.  सौर उर्जेस प्राधान्यस्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या इमारतींवर सोलर रूफ टॉप उभारण्यात येणार आहे. त्यात महापालिकेचे संततुकारामनगर येथील वायसीएम रूग्णालय, निगडीतील जलशुद्धिकरण केंद्र, कासारवाडीतील एसटीपी, पिंपळेगुरव येथील निळू फुले सभागृहाच्या इमारतींवर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.ई- लर्निंगसाठी तीन शाळामहापालिकेच्या तीन शाळांमध्ये ई- लर्निंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पायलेट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सायकल शेअरींगसाठी २७ जागांची निवड केली आहे. खासगी संस्थेची मदत घेतली जाणार असून महापालिकेची कोणतीही गुंतवणूक नसणार आहे. .................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड