शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाणंद रस्त्यांना आता नकाशा अन् मालमत्ता पत्रिकाही;जीआयएसच्या मदतीने स्वामित्व योजनेत नकाशा तयार होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:09 IST

पाणंद रस्ते कायमचे खुले राहावेत यासाठी त्या रस्त्याला उपग्रह नकाशा आणि कोऑर्डिनेट लावून स्वामीत्व योजनेत त्याचा नकाशाच तयार करण्यात येणार आहे.

पुणे : जिल्ह्यात गावागावांमधील बंद झालेले पाणंद, शिवरस्ते मोकळे करण्याची मोहीम कायमच सुरू असते. तेच ते रस्ते खुले करून तहसीलदारही आपली पाठ थोपाटून घेतात. ही एक साखळी असून यापुढे खुले झालेले पाणंद रस्ते कायमचे खुले राहावेत यासाठी त्या रस्त्याला उपग्रह नकाशा आणि कोऑर्डिनेट लावून स्वामीत्व योजनेत त्याचा नकाशाच तयार करण्यात येणार आहे.शिरूर तालुक्यातील १० गावांमध्ये ही मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहेत. याला नकाशाची जोड असल्याने यावर हरकती आल्या, तरीही दोन सुनावणींमध्ये त्यात निकाल देण्यात येईल. त्यामुळे रस्ते कायमस्वरुपी खुले राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. हा प्रयोग सुरुवातीला पुणे त्यानंतर राज्य आणि सबंध देशभर राबविला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मालमत्ता आणि पाणंद रस्त्यांवरून आजही गावागावांमध्ये वाद झडत असतात. त्यामुळे जिल्ह्यात पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहिम पुन्हा हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ९०० किलोमीटरचे रस्ते मोकळे केल्याचा फायदा जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांना झाला आहे. मात्र, रस्ते खुले करणे आणि त्यानंतर ते पुन्हा बंद होणे ही एक साखळी असून तहसीलदार प्रांताधिकारी रस्ते खुले करण्याचा केवळ दावा करतात.प्रत्यक्षात जमिनीवरील स्थितीत विशेष फरक पडत नाही. त्यामुळे हे रस्ते कायमस्वरुपी खुले राहावेत यासाठी या रस्त्यांना नकाशे जोडण्याचा अभिनव राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने स्वामीत्व योजनेतून सर्वच मालमत्तांचे नकाशे तयार करून मिळकत पत्रिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्याच धर्तीवर आता पाणंद रस्त्यांची पत्रिका अर्थात नकाशा तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

यासाठी रस्त्यांना जीआयएसची मदत घेऊन कोऑर्डिनेट जोडून त्याला महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राकडून (एमआरसॅक) मिळालेला नकाशा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याची पक्की पत्रिका तयार होणार आहे.भुमी अभिलेख विभागाने अशा रस्त्यांची नोंद आता गाव नकाशातही घेण्याचे ठरविले आहे. कॉऑर्डिनेट असल्याने या रस्त्यांच्या मोजणीची गरज भासणार नाही. त्यामुळे हे रस्ते कायमस्वरूपी रेकॉर्डवर येतील. याची नोंद झाल्यानंतर त्यावर हरकत आल्यास नकाशा असल्याने मामलेदार न्यायालयातही केवळ एक ते दोन सुनावणीत त्याचा निकाल देणे शक्य होणार आहे. रस्ते प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

या मोहिमेमुळे रस्त्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. यामुळे रस्त्यांवरून होणारे वाद टळतील. या १० गावांनंतर सबंध जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य तसेच देशपातळीवरही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूक