गांधीलेवस्ती ते बेली मंदिरपर्यंतचा पाणंद रस्ता केला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:18 IST2021-03-13T04:18:56+5:302021-03-13T04:18:56+5:30

गांधीलेवस्ती ते महादेव मंदिर बेलीपर्यंतचा पाणंद रस्ता मागील अनेक दिवसांपासून बंद होता. परिणामी येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतमाल दळणवळण करताना ...

The Panand road from Gandhilevasti to Bailey temple was opened | गांधीलेवस्ती ते बेली मंदिरपर्यंतचा पाणंद रस्ता केला खुला

गांधीलेवस्ती ते बेली मंदिरपर्यंतचा पाणंद रस्ता केला खुला

गांधीलेवस्ती ते महादेव मंदिर बेलीपर्यंतचा पाणंद रस्ता मागील अनेक दिवसांपासून बंद होता. परिणामी येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेतमाल दळणवळण करताना तसेच श्रीक्षेत्र महादेव मंदिर बेलीकडे जाणाऱ्या भाविकांना प्रवासास अडचण निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच शशिकला घेनंद, संतोष यादव, वैभव घेनंद, अर्जुन घेनंद आदींनी पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या सहमतीने सदरचा रस्ता लोकसहभागातून खुला करण्यास सहमती दर्शविली.

त्यानुसार बुधवारी (दि. १०) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, युवा नेते मयूर मोहिते, मंडल अधिकारी विजय घुगे, ग्रामसेविका सपना शिंदे आदींनी रस्त्याची पाहणी करून कामाचा शुभारंभ केला.

याप्रसंगी उपसरपंच उज्ज्वला घेनंद, संतोष गांधीले, नीता घेनंद, महेंद्र घेनंद, महेश गांधीले, बाळासाहेब घेनंद, तुकाराम घेनंद, तुळशीराम यादव, सुभाष गांधीले, रामदास घेनंद, किसन घेनंद, शिवाजी घेनंद, सुरेश घेनंद, राहुल घेनंद, यौजन गांधीले, सचिन घेनंद, सोमनाथ घेनंद, तलाठी शरद दाते, वैशाली झेंडे, सारिका विटे, राहुल पाटील, सतीश शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

१२ शेलपिंपळगाव

वडगाव - घेनंद (ता. खेड) येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना निर्मला पानसरे व मान्यवर.

Web Title: The Panand road from Gandhilevasti to Bailey temple was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.