शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Pandhari Chi Wari: पुणेकरांचा भावपूर्ण निरोप घेत पालख्या पंढरीकडे मार्गस्थ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:08 IST

शुक्रवारी सकाळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्या...

ठळक मुद्देपुण्यातील आदरातिथ्याने वारकरी सुखावले 

पुणे : ‘‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’ याची प्रचिती गुरुवारी वारकरी बांधवांना पुणेकरांच्या अगत्यशीलतेतून आली. कीर्तन, हरिनामाचा गजर, माऊलींचे दर्शन  अशा भक्तिमय वातावरणात पुणेकर गुरुवारी भक्तिरसात चिंब झाले. पावसाने वारकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.      जगद्गुरू संत तुकाराममहाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात विसावल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी तर भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. दिवसभर विविध ठिकाणी रंगलेला कीर्तन सोहळा, ट्रकजवळ बसले अभंगांची बैठक, रस्त्यावर चाललेला राम कृष्ण हरि, माऊलींचा जयघोष कानावर पडला. गुरुवारी दुपारी झालेल्या पावसाने एकीकडे दिलासा दिला तर वारकऱ्यांची काहीशी तारांबळही उडाली.    

पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पालख्यांचे पुण्यातून प्रस्थानज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष करत, टाळ-मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेली व भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरकडे निघालेले वारकरी दोन दिवस पुणेकरांचा प्रेमाचा पाहुणचार घेऊन शुक्रवारी सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. परंपरेनुसार दोन्ही मंदिरांमधील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींच्या पादुकांवर विधीवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकड आरती होऊन दोन्ही पालख्या सासवडकडे मार्गस्थ झाल्या . संत तुकाराममहाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने मार्गक्रमण करत लोणी काळभोर येथे विसावेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे मुक्काम करणार आहे. या मार्गावरील सर्वांत अवघड मानली जाणारी दिवेघाटाची चढण आहे. त्यासाठी वारकऱ्यांनी गुरुवारी विश्रांती घेतली. ..........पुण्यातील आदरातिथ्याने वारकरी सुखावले पुण्यातील विविध शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये, मंदिरांमध्ये वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. समाजमंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची लगबग सुरु होती. पालख्या पुण्यात विसावल्यावर कायमच भोजन आणि निवासाची उत्तम व्यवस्था होते. पुण्यातून निघाल्यावर राहुट्यांचा आसरा घ्यावा लागतो, असे वारकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी