शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

वाहतूक शाखेच्या वेबपेजवर मिळणार पालखीचे अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 19:30 IST

पालख्यांचे आगमन पुणे शहरात होताच पोलिसांचे वेबपेज कार्यान्वित होणार आहे.

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्थेतील बदल, उपलब्ध मार्गाची माहितीवर्तुळाकार वाहतूक योजनावेबपेजवर इच्छितस्थळी जाण्यासाठीच्या मार्गाचीही माहिती दिली जाणार

पुणे : पालखीमार्गाची इत्थंभूत माहिती वाहनचालकांना देण्यासाठी वाहतूक शाखेने खास वेबपेज तयार केले आहे़. या वेबपेजच्या माध्यमातून तीन दिवस पालखीचे अपडेट मिळू शकणार आहेत़. शहरातील वाहतुकीसाठी खुले असणारे रस्ते, बंद असणारे रस्ते, पालखीची मार्गक्रमणा, विसावा आदींबाबतची माहिती वाहनचालकांना मिळणार आहे़. त्याचबरोबर या वेबपेजवर इच्छितस्थळी जाण्यासाठीच्या मार्गाचीही माहिती दिली जाणार आहे. वाहतूक शाखेने तयार केलेल्या वेबपेजचे नाव ‘https://changebhai.in/palkhi2019 असे नाव आहे. शहरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (२६ जून) होणार आहे. पालख्यांचे आगमन पुणे शहरात होताच पोलिसांचे वेबपेज कार्यान्वित होणार आहे. शहरातून पालख्या शुक्रवारी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पालख्या मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांचे वेबपेज कार्यान्वित राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नियोजन) अरविंद कळसकर याप्रसंगी उपस्थित होते. पालखीच्या आगमनानंतर वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते, वाहनचालकांना वापरता येणारे रस्ते, पालखीचा मार्ग, प्रमुख चौकात पोचण्यास लागणारा अपेक्षित वेळ, विसाव्याचे ठिकाण याबाबतची माहिती या वेबपेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

वर्तुळाकार वाहतूक योजनामुंबई, नगर, सोलापूर मार्गाने शहरात येणाऱ्या तसेच बाहेर जाणाऱ्या वाहनचालकांसाठी वर्तुळाकार वाहतूक योजना सुरू करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांनी शक्यतो पुढील चार दिवस मध्यभागातील रस्त्यांचा वापर करणे टाळावा. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीRto officeआरटीओ ऑफीस