शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:15 IST

नितीन गडकरी यांनी पत्राची दखल घेत पालखी महामार्गाच्या चौकशीचे आदेश दिले

इंदापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतुन निर्माण झालेल्या पालखी महामार्गाचा आता पंचनामा होणार आहे. गडकरी यांची भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी(दि १४)  दिल्लीत भेट घेवून पालखी मार्गाच्या कामासंदर्भात नागरिक व कार्यकर्त्यांची कैफियत त्यांच्यासमोर मांडली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सूचना देऊन झालेल्या कामांची चौकशी करावी,अशी मागणी करीत कामाच्या पाहणीसाठी थेट ‘स्पॉट व्हिजिट’ करण्याचे आमंत्रण दिले आहे.  

गडकरी यांनी देखील त्याची दखल घेत महामार्गाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दै.'लोकमत ' शी बोलताना दिली. पाटील म्हणाले की, पाटस ते बारामती व तोंडले बोंडले ते पंढरपूर या भागातील पालखी मार्गावरची रस्त्याची कामे अत्यंत दर्जेदार झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर बारामती ते इंदापूर व इंदापूर ते लुमेवाडी या पालखी मार्गाच्या कामाबद्दल खूप तक्रारी आहेत. दर्जेदार पध्दतीने काम झालेले नाही. संबंधित ठेकेदाराने ब-याच पोटठेकेदारांकडे कामांची जबाबदारी दिली आहे. होणारी कामे पहाण्यासाठी देखील ठेकेदार येत नाही.

या मार्गावर चार पाच अपघात झालेले आहेत. सर्वत्र अर्धवट कामे पडलेली आहेत. पालखी आलेली आहे. कामासंदर्भात लोकांच्या व कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत,असे पाटील म्हणाले. आजच्या दिल्ली भेटीत केंद्रीय रस्त वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेवून पालखी मार्गाच्या कामाबाबतची कैफियत त्यांच्यासमोर मांडली. आपले व  भाजपचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शरद जामदार यांचे तक्रारीचे पत्र दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सूचना देऊन झालेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी करुन, त्या मार्गाची पाहणी करण्याचे निमंत्रण ही त्यांना दिले आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन पाटील यांच्या पत्रातील मुद्दे

 इंदापूर तालुक्यातून ७६ किलोमीटरचा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जात आहे.  कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक नागरिक व पदाधिका-याकडून निवेदन व तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे काम काही ठिकाणी नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा प्रकल्प महत्वकांक्षी आहे. ते अंदाजपत्रकानुसार गुणवत्तापूर्ण व्हावे याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सूचना देऊन झालेल्या कामांची चौकशी करावी. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022