पालखी रथाचे काम पूर्णत्वाकडे
By Admin | Updated: November 11, 2014 23:30 IST2014-11-11T23:30:04+5:302014-11-11T23:30:04+5:30
छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक, तुळापूर असा अभूतपूर्व भव्यदिव्य अशा पालखीसोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.

पालखी रथाचे काम पूर्णत्वाकडे
कोरेगाव भीमा : धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराजांच्या 325व्या बलिदान स्मरणदिन वर्षपूर्तीनिमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक, तुळापूर असा अभूतपूर्व भव्यदिव्य अशा पालखीसोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. ही पालखी सोहळ्याची परंपरा कायम राहणार आहे. या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून पालखी रथाचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे पुणो जिल्हा कुस्तिगीर संघटनेचे अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुख पै. संदीप भोंडवे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती संभाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आयोजनासाठी पुणो जिल्हा कुस्तिगीर संघटनेचे अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुख पै. संदीपआप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळा समिती स्थापन करण्यात येणार आहे. या पालखी सोहळ्याचे नियोजन तुळापूरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवले, शिवाजी शिवले, वढु बुद्रुक व तुळापूर येथील ग्रामस्थ करत असल्याची माहिती मुखई (ता. शिरुर) ग्रामपंचायत सदस्य पै. सचिन पलांडे, विपुल शितोळे यांनी दिली.
जगदगुरू तुकोबारायांची देहू ते पंढरपूर पालखी सोहळा सुरु करण्यास शंभूछत्रपतींनी सर्व खर्च व संरक्षण पुरवले होते. हाच इतिहासाचा ठेवा उराशी बाळगून तुकोबारायांच्या पालखीप्रमाणोच चांदीचा मुलामा दिलेला पालखी रथ तयार करण्याचे काम वेगात सुरु आहे. या पालखीसाठी आवश्यक रथ, संभाजीमहाराजांचा चांदीचा मुखवटा, पादुका व इतर सामग्रीसाठी अंदाजे 2क् ते 22 लाख रुपये खर्च अपेक्षित असून या संपूर्ण खर्चाची जबाबदारी शंभूभक्तांनी घेतली आहे. पुणो जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शंभूभक्तांनी आजपर्यत 12 लाखांपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आश्वासन दिले असून, अडीच लाख रुपयेही जमा झाले आहेत. या पालखी सोहळ्यास महाराष्ट्रातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, विविध भागातून पदाधिकारी, शंभूभक्त उपस्थित राहणार असून, या पालखी सोहळ्याच्या माहिीतीसाठी व लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन पै. संदीप भोंडवे यांनी केले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज यांच्या 325 व्या बलिदान स्मरणदिन वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रात साजरे होत असताना व शिवशंभू छत्रपतींचा खरा इतिहास समाजासमोर आला नसल्याने तो समाजासमोर मांडण्यासाठी दि. 18 मार्च ते 2क् मार्च या तीन दिवसांचा छत्रपती संभाजीमहाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
18 मार्च रोजी सकाळी छत्रपती शंभूराजांच्या जन्मस्थळ किल्ले पुरंदरावर रुद्राभिषेक घातल्यानंतर शिवशंभूंच्या जयघोषात अभूतपूर्व पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. पुरंदरावरुन पालखी वडकी (ता. हवेली) याठिकाणी मुक्कामी थांबणार असून, त्यानंतर दि. 19 रोजी पालखीसोहळा संभाजी महाराजांचे समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरुर) याठिकाणी मुक्कामी असणार आहे.
दि.2क् मार्च रोजी फाल्गुन वद्य अमावास्येला सकाळी समाधिस्थळ श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे शंभूछत्रपतींच्या समाधीस रुद्राभिषेक घालण्यात येणार असून तद्नंतर पालखी सोहळा शंभूछत्रपतींचे बलिदानस्थळ श्री क्षेत्र तुळापूर (ता. हवेली) या ठिकाणी दुपारी 11 वाजता समाधीची व शंभूराजांच्या पादुकांची पूजाआर्चा होऊन पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टीने पालखी सोहळ्याची समाप्ती होणार आहे.