शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीपूर्ण संबंधासाठी पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे : लष्कर प्रमुख बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:22 IST

मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ दीक्षांत संचलन सोहळा  प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पदे देण्यासाठी प्रयत्नशील 

पुणे : पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल  पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे. या पुढे जर पाकिस्तानला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्यांनी एक पाऊल पुढे येणे गरजेचे असून यासोबतच स्वत:ला ‘इस्लामिक' राष्ट्र न म्हणवता, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करावी, असा उपरोधिक टोला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला लगावला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील १३५ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रावत बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाप्रसंगी भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित व्हावे अशी इच्छा असल्याचे व्यक्त केले. या साठी भारताने पहिले पाऊल टाकावे अशी अपेक्षा व्यक्त करत असे झाल्यास आम्ही दोन पावले टाकू असे विधान केले होते. या बाबत त्यांना प्रश्न विचारला असता रावत म्हणाले, आतापर्यंत भारताने पाकिस्तान सोबत कायम सौदाहार्याची भावना ठेवली आहे. दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी एक पाऊन पुढे येऊन भारताने पुढाकार घेतला आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.  मात्र, पाकिस्तान स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणवते. अधिका-यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी प्रबोधिनीत हे नवे तंत्र तसेच शस्त्रास्त्रे आणली जात आहे. प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, असेही रावत म्हणाले. .......................सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपीपदे देण्यासाठी प्रयत्नशील सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पणे देता येईल का याचा विचा सुरू आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. प्रत्यक्ष  युद्धभीमीवर महिलांना नियुक्त करणे सद्यस्थितीत शक्य नाही. मात्र, मानसशास्त्र, भाषा अनुवादक, लेखापाल, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत महिला चांगले काम करू शकतात. या साठी महिला अधिका-यांचा विचार होत आहे. लवकरच याबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.  सैन्य दलातील बरेचसे जवान हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांप्रमाणे महिलांसोबत काम करण्याची मानसिकता अजून त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांची नियुक्ती नाही, असेही रावत यांनी स्पष्ट केले. ...................... 

टॅग्स :PuneपुणेBipin Rawatबिपीन रावतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान