स्मार्ट सिटी योजनेतील विशेष क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या परिसरातील प्रकल्पांना चालना देण्यासाठी, नवे प्रकल्प विचारात यावेत यासाठी आता स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे. ...
शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या सार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. ...
राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या १०० शाळा निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शाळांसाठी शिक्षण विभागाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार ...
दुचाकीवरून जात असताना रागाने पाहिल्याच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वडगाव बुद्रुक येथे घडला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून यातील पाच आरोपी अल्पवयीन आहेत. ...
महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद राज्य सरकारने अनेक वर्षे रिक्त ठेवले असून, त्यासंबंधी महापालिकेला निर्णय देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे उपायुक्तपदावरील पदोन्नतीलाही विलंब होत असून, त्यासाठी काही वरिष्ठ अधिका-यांनी ...
एड्स रोगाबाबत समाजात चांगली जनजागृती झालेली आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यात यश येऊ लागले आहे. शून्य गाठायचा आहे, हे उद्दिष्ट आरोग्य विभागाने डोळ्यांसमोर ठेवले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ...
चाकण येथे महा ई-सेवा केंद्रावर पोलीस आणि प्रशासन यांनी छापा टाकत बोगस आधार नोंदणी केल्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. बोगस आधारकार्ड आणि आधारकार्डसाठी जादा रक्कम घेत असल्याच्या लेखी तक्रारी जिल्हा अधिकारी आणि खेड उपविभागीय अधिकारी यांच्या कडे ...
नांदेड सिटी येथील आयोजित महारष्ट्र केसरीसाठीच्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत खेडच्या शिवराज राक्षे याने पुणे जिल्हा महाबली किताब जिंकला. डिसेंबर महिन्यात भूगाव येथे होणाºया ६१व्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित केलेल ...
नगर परिषदेच्या उर्दू शाळेची इमारत पाडण्याचा नगर परिषदेचा कुठलाही हेतू नसून, त्याबाबत विनाकारण गैरसमज पसरवला जात असल्याचे नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
पुणे जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कारवाईवर भर देण्यात येत असला, तरी नगर परिषदांकडून मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या कारवाईत हलगर्जीपणा केला जात असल्याचे चित्र आहे. ...