दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सराईत आरोपी मनोज रवी साळवी उर्फ चोरमन्या (वय २६) याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ...
वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होणार्या चेतनेतून विज्ञाननिष्ठ नवे वैश्विक जीवन निर्माण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. ...
जबरी चोरी, वाहन चोरी, दरोड्याचा प्रयत्न व इतर चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले. ...
हिंदु जनजागृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये गोरक्षण, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, धर्मांतरण आणि हिंदू राष्ट्राची मूलभूत संकल्पना या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. ...
ओएलएक्स आॅनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईटवर मोबाईल विक्रीसाठी दिलेल्या जाहीरातीला प्रतिसाद देताना नाव बदलून मोबाईल विकत घेण्याचा बहाणा करुन तो चोरुन नेणाऱ्याला सायबर सेलने पनवेल येथून अटक केली. ...
राजेंद्रनगर येथील पीएमसी कॉलनीमध्ये जवळपास १० कुत्री मेल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले आहे. त्यांना कोणीतरी विष घालून मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
राज्य सरकारने दुधाचा हमीभाव २७ रुपये लिटर जाहीर केला असतानाही खासगी व सहकारी दूध संस्थांनी बाजारभाव कमी केले आहेत. दुधाचे बाजारभाव लिटरला २० ते २२ रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...
शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने बांधलेल्या समाजमंदिराचा काही भाग आता अभ्यासिका म्हणून वापरण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या या प्रस्तावास समाज विकास विभागाने सहमती दर्शवली आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अॅटोमोटिव्ह आॅटोमोशन, आयटी/आयटीएस, रिटेल मॅनेजमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी या विषयांच्या एम. वोक. (मास्टर इन वोकेशन) पदव्युत्तर अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहेत. ...
संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, साहित्य व रंगावली या कलाविधांच्या माध्यमातून ‘यशोयुतां वंदे’ हा अनोखा कार्यक्रम सादर होणार आहे. मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवारवाड्याच्या प्रांगणात सावरकर गाथा उलगडेल. ...