महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे विकास हस्तांतरण शुल्क (टीडीआर) विकसकांना दिले जाते. परंतु गेल्या वीस वर्षांत या टीडीआरचे लेखापरीक्षणच (आॅडिट) झाले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...
सिंहगड रस्त्यावरील पर्वतीलगतचा अडीच एकरांचा भूखंड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी व विरोधातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस यांनी विनाचर्चा, विनावाद मूळ मालकाला परत करण्याचा ठराव मंजूर केला. ...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेतला असताना, साहित्य महामंडळाला मात्र आंदोलनाचे वावडे असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. ‘अभिजात’च्या दर्जाचे श्रेय विशिष्ट व्यक्ती अथवा संस्थेच्या पारड्यात पडू नय ...
झोपडपट्टी पुनर्विकास किंवा अन्य योजनांसाठी जागा मिळवून त्यानंतर तेथील सार्वजनिक शौचायले पाडण्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आज गदारोळ केला. या संदर्भात प्रशासनावरच आरोप करण्यात आले व त्याला उत्तर देताना प्रशासनाची दमछाक झ ...
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याचा सर्वेश सुभाष नावंदे याला भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्णपदक मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. ...
गाडी शिकत असताना त्यावरील नियंत्रण सुटल्याने मार्केट यार्डमधील गाळ्यात घुसलेल्या एक वाहनाने मोटार व तीन दुचाकींना धडक दिली़ या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत़ ही घटना छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामधील गाळा क्र. ६६०मध्ये सोमवारी रात्री ९ वाजता घडली़ ...
फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर मोटार घातली़ ते बोनेटवर पडले असताना त्या अवस्थेत त्यांना दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, चतु:शृंगी पोलीस ठाण्य ...
प्लास्टिक कच-यापासून रस्ते बनविण्याचे तंत्र आम्ही जर्मनीवरून आयात करीत असून, त्याचबरोबर कचरा वर्गीकरणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहर कचरामुक्त करणार आहोत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. ...
महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित माहेश्वरी फुटबॉल लीगच्या दुसºया सत्रात किड्स गटामध्ये व्ही नाईन रॉकर्स, तर खुल्या गटामध्ये गॅरॉन ग्लॅडिएटर्स संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. ...
महापालिकेच्या शहरातील जकात नाक्याच्या जागा पुणे महानगर परिवहन महामंडळास बस पार्किंगसाठी देण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. परंतु ही जागा देताना सभासदांनी महापालिका प्रशासनाच्या मूळ प्रस्तावाला प्रचंड विरोध करत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवू ...