पीयूसी नसल्याने गेल्या ८ वर्षांत शहरातील सुमारे १५ हजार वाहनचालकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, १ हजार ८३२ जणांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागले आहे. ...
मावळते आयुक्त कुणाल कुमार यांनी पदभार सोडताना आपल्या दोन योजनांसाठी महापालिकेत दोन स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यावर अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. यासंबधीच्या आदेशावर त्यांनी शुक्रवारी स्वाक्षरीही केली व शनिवारी त्याची अंमलबजावणीदेखील झाली. ...
सोळा शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यासाठी काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रती शिक्षक पाच लाख रुपये घेतले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. ...
आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांमधील मुलांना यापुढे जेवणाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे (डीबीटी) विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे. ...
सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करणे गरजेचे आहे. या महिनाअखेरपर्यंत ३०० तालुक्यांतील सातबारा संगणकीकरणाचे नियोजन करून कार्यवाही करावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले. ...
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सदाशिव शिवदे (वय ८१) यांचे शनिवारी रात्री अल्पआजाराने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...
पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातून कारटेप, म्युझिक सिस्टिम चोरीला जात असल्याचे व हे गुन्हे ठराविक दिवशी व ठराविक वेळी घडत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने दिशा ठरवून तपास सुुरु केला़. ...
शनिवारी दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी ढग दाटून आले. तर काही ठिकाणी वादळ निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात हा बदल सुरू होता. आकाशात ढगांनी गर्दी केल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली ...