वेळ सायंकाळची... ते दोघे येणार, याची चर्चा पसरली आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या आगमनाकडे लागल्या. बॉलिवूडमधल्या नव्या ‘चांदनी’ने बदामी आणि गुलाबी रंगाच्या पेहरावात तर त्याने कूल अशा टीशर्ट आणि जीन्सच्या वेशभूषेत ‘धडक’ मारली आणि एकच जल्लोष सुरू झाला. ...
लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन ज्या पक्षाच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीही सहभाग घेतला नाही, त्यामुळेच चले जाव चळवळीसंदर्भात त्या अज्ञानी आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे. ...
माहिती केंद्रासाठी जागेच्या शोधात असलेल्या महामेट्रोला अखेर महापालिकेने छत्रपती संभाजी उद्यानात जागा दिली आहे. १५ आॅगस्टला हे माहिती केंद्र सुरू होईल. ...
मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. ...
समृद्ध जीवन समूहातील मालमत्ता खेरदी-विक्रीचे निर्णय कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवार घेत. कंपीनीच्या आत्तापर्यंत ३६५ मालमत्ता तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी वैशाली यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद ...
दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हडपसर गाडीतळावर ९.४५ वा.आगमन झाले. महापौर मुक्ता टिळक, माजी महापौर वैशाली बनकर यांनी स्वागत करून पादुकांची पूजा केली. ...
मित्रांच्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याच्या रागातून तीन मित्रांनी एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़ याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी १२ तासांच्या आत तिघांना अटक केली आहे. ...
घरोघरी आणि हातोहाती मोबाइल आल्यानंतर पत्रव्यवहार करणाऱ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे. व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्लिकेशनमुळे मेसेज आणि आॅनलाइन बँकिंगमुळे पैसे काही क्षणांत एकमेकांना पाठवणे शक्य होते. ...
फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मधील दोन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमुळे पुन्हा एकदा संस्थेमधील वातावरण अशांत बनले आहे. मात्र, याच अभिव्यक्तीच्या कृतीवरून विद्यार्थ्यांमध्येच फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...