प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी ६ हजार २६४ सदनिका बांधण्यास व लाभार्थींबरोबर करार करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. ...
‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१८’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ‘लोकमत’ पिंपरी कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत काढण्यात आली. ...
महापालिकेने शहरातील प्रत्येक नळजोडाला मीटर बसवण्याचे काम त्वरित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व व्यावसायिक नळजोडांना मीटर बसवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजावे लागतील. ...
गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये विविध आजारांनी थैैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगीने आरोग्य विभागाला ताप दिला असून, आता इतर गंभीर आजारांवरील औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ...
दापोडी (ता. दौंड) येथे रविवारी मध्यरात्री टुलेवस्ती व इंगळेवस्तीत रात्रीच्या सुमारास घराबाहेर झोपलेल्या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करीत ८ जणांना गंभीर जखमी केले. ...
तिरपाड (ता. आंबेगाव) केंद्रातील ८ प्राथमिक शाळांचे समायोजन करून ‘मध्यवर्ती शाळा’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने नुकताच घेतला आहे. ...
रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे पाटस रेल्वे स्थानकात पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस तब्बल दीड तास थांबवून प्रवाशांना वेठीस धरण्याची घटना रविवारी (दि. ४) घडली. संतप्त रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. ...