बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा महायुतीकडून सुळे यांच्याविरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. ...
कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूसनंतर आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर हापूसला स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी आंबा उत्पादक शेतकरी पाठपुरावा करत आहेत. ...
पुुणे-नगर रस्त्यावर लूटमार करणाऱ्या टोळीतील तिघांना शिक्रापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिक्रापूर पोलिसांना पंधरा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ...
चासकमान कालव्याच्या थेंबभरही पाण्याचा लाभ झाला नाही, तरीही शासनाने पुनर्वसनासाठी जमिनी संपादित करण्याचा घाट घातला आहे, हे अन्यायकारक असून, प्रसंगी रक्त सांडू, पण जमिनींचा ताबा घेऊ देणार नाही, असा निर्धार काळुस (ता. खेड) येथील शेतक-यांनी व्यक्त केला. ...
महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित ठेवलेल्या जुन्नर तालुक्याला दिलासा मिळाला असून राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके व २६८ मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहे. ...
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील वनस्पतिशात्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. राणी भगत यांनी लिहिलेल्या ‘फ्लोरिस्टिक डायव्हर्सिटी आॅफ मुळशी, नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. ...
फसवणुक प्रकरणातील एका हायप्रोफाईल आरोपीला न्यायलयीन कामकाजासाठी येरवडा जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने परस्पर घरी घेऊन जाणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले. ...