पाडळी जि. प. गटात दवाखाना आपल्या घरी सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST2021-07-10T04:09:32+5:302021-07-10T04:09:32+5:30
जि. प. सदस्य देवराम लांडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल लांडे यांच्या संकल्पनेतून प्राथमिक ...

पाडळी जि. प. गटात दवाखाना आपल्या घरी सुविधा
जि. प. सदस्य देवराम लांडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अमोल लांडे यांच्या संकल्पनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र आपटाळे, इंगळून व मढ येथील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आरोग्य आपल्या दारी दवाखाना आपल्या घरी या संकल्पनेतून ५२ गावांमध्ये मागील एक महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे. प्रत्येक नागरिकाला तपासून थंडी, ताप, सर्दी, खोकला, रक्तवाढीसाठी, कॅल्शियम वाढीसाठी तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन सी, डी प्लस पावडर, झिंक १५ तसेच इतर आजारावरील गोळ्या औषधांचे वाटप प्रत्येक कुटुंबाला करण्यात येत आहे.
--
फोटो क्रमांक : ०९जुन्नर दवाखाना आपल्या दारी
फोटो ओळ -निरगुडे पाडळी जि. प. गटात दवाखाना आपल्या घरी उपक्रमाअंतर्गत गोळ्या औषधांचे वाटप आदिवासी कुटुंबांना करण्यात येत आहे.